*शेतकरी प्रतिअधिवेशन -नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या धरतीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भूमीपुत्र संघर्ष वाहिनीचे एक अभिनव आंदोलन*

0
557
Google search engine
Google search engine

🍁🍁 अभिजित फाळके यांनी केले शेतकऱ्यांना आवाहन ! 🍁🍁

सोमवार, ११ डिसेंबर चलो नागपूर

रुपेश वाळके – मोर्शी /

खूप साऱ्या लोकांनी नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन म्हणजे मौजमस्ती करण्याचे ठिकाण करून ठेवले आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सरकारी धोरणामुळे नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असतांना हिवाळी अधिवेशनात लोकप्रश्नावर कुठलीही चर्चा न करता फक्त एकमेकावर आरोप करत अधिवेशन हे तमाश्याचे ठिकाण आपल्या लोकप्रतिनिधिनी बनवून ठेवले आहे. आज सोयाबीन हमीभावाच्या खालच्या दराने खरीदी केले जाते. बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. शेतातिल विजेचे बिल फुगवून कष्टकरी बळीराजाला देण्यात येते पण शेतात १२ तास दिवसा वीज देण्याची कुवत शासनात नाही. शेती तोट्यात असून सुद्धा शेतीउपयोगी वस्तूवर मोठ्या प्रमाणात जी.एस.टी लावण्यात आला आहे. वन्यजीव कायद्यामुळे शेतकरी आपले पीक उघड्या डोळ्यांनी नेस्तनाबूत होतांना हतबलपणे बघतो आहे. कर्जमाफीच्या नावाने फक्त जाहिरातबाजी करण्यात राज्यकर्ते खुश आहे. शेतीविरोधी कायदे आपल्यावर लादले जात आहेत. आपले बांधव स्वताला लटकवुन आपले आयुष्य संपवता आहेत आणि आपण इतके सगळे अत्याचार लाचारासारखे सहन करून घेतो आहोत.
का तर आपण संघटित नाही म्हणून.
मग का आपण ऐकत्र येवून हिवाळी अधीवेशनाच्या धर्तीवर *प्रति शेतकरी अधिवेशन* घेवु नयेत ?
का आपला आवाज सातत्याने व्यवस्थेच्या कानात ओतू नये ?

म्हणून आम्ही नागपूरला महाराष्ट्रातील शेतकर्यांच प्रतिअधिवेशन घेतो आहोत. ज्यात फक्त आणि फक्त शेतकरी आपला आक्रोष व्यवस्थेपर्यंत पोहचवतिल.

हया अधिवेशनाची खालील वैशिष्टे असतील.

👉 संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी हया अधिवेशनाला येतील. दोन दिवस ऐकत्र बसून आपल्या समस्या मांडतिल. प्रत्येक समस्सेचा एक ठराव बनवल्या जाईल. तो लाखो शेतकऱ्यांच्या सहीनीशी मा. मुख्यमंत्री मोहोदयाना दिल्या जाईल.

👉 सरकारला हया ठरावाच्या प्रशासकिय मान्यतेला ७ दिवसाचा कालावधी दिला जाईल. सात दिवसात जर सरकार कडून कुठलेही सकारात्मक पाऊल दिसले नाही तर महाराष्ट्रातील *शेतकरी हिवाळी अधिवेशन बंद पाडतिल*.

👉 हे आंदोलनं जरी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीने आयोजित केले असले तरी महाराष्ट्रातिल प्रत्येक शेतकरी संघटनेच्या व्यक्तीला आणि शेतकरी प्रश्नावर संवेदनशील असलेल्या प्रत्येक व्यक्तीस आम्ही जाहीर निमंत्रण देतो आहोत. हे एक खुले व्यासपीठ आहे ज्यात महाराष्ट्रातिल कानाकोपर्यातून शेतकरी आणि शेतकरी चळवळीतिल लोक सम्मेलीत होने हे आमचे ध्येय आहे.

म्हणून तमाम महाराष्ट्रातील बळीराजाला ठामपणे सांगू इच्छितो की….

*सोडा ही लाचारी,तोडा ही बेडि,
शहरात फक्त विकास आणि भकास झाली खेडी.
मी फक्त शेतकरी आणि धर्म माझा शेती.
भाव नाही भेटला तर करू व्यवस्थेची माती….

*पटले तर नक्की या आणि शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक प्रतिअधिवेशनाचे साक्षीदार व्हा.*