हिंदु नेते आणि कार्यकर्ते यांच्यावरील प्राणघातक आक्रमणांचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा ! – ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, वारकरी संप्रदाय

0
906
Google search engine
Google search engine

सातारा – देशभरात हिंदु नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होण्याच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. सर्व हत्यांचा तपास केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे द्यावा. या आक्रमणांचा सूत्रधार शोधून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत, अशी मागणी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज यांनी केली. ते हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १९ नोव्हेंबरला येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.

या वेळी विश्‍व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, रणरागिणी शाखेच्या सौ. गीतांजली गोंधळेकर आणि हिंदु जनजागृती समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनी मार्गदर्शन केले. बजरंग दलाचे श्री. मुकुंद पंडित आणि हिंदु महासभेचे श्री. उमेश गांधी यांसह हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राष्ट्रीय हिंदू आंदोलनात केलेल्या अन्य मागण्या

१. शासनाने ताजमहालमधील बंद खोल्या उघडून ती हिंदु वास्तू कि इस्लामी थडगेे आहे, याचे इतिहासतज्ञांच्या मार्गदर्शनानुसार संशोधन करावे आणि तोपर्यंत तेथील नमाजपठण बंद ठेवण्यात यावे ! – सौ. विद्या कदम, हिंदु जनजागृती समिती

२. चित्रपटामधून राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे, ही इतिहासाची मोडतोड असून हे दुर्दैवी आहे. याला हिंदूंनी सर्व शक्तीनिशी विरोध करावा. शासनाने अशा चित्रपटांवर तात्काळ बंदी घालावी ! – श्री. चंदन जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

३. कर्नाटकातील काँग्रेस शासनाने हिंदूंच्या हत्या आणि धर्मांतर घडवून आणणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करून आक्रमकांचे उदात्तीकरण करू नये ! – श्री. हेमंत सोनवणे, हिंदु जनजागृती समिती