धर्मनिरपेक्षतेच्या जोखडातून मुक्त करून भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा पुरुषार्थ ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र

0
597

१. विश्‍वातील प्रत्येक देशाची ओळख देशाच्या संस्कृतीवरून होते. धर्म हा संस्कृतीचा आत्मा आहे. विश्‍वातील प्रत्येक राष्ट्रामध्ये बहुसंख्यांकांच्या धर्माला राष्ट्रीय मान्यता आहे. विश्‍वात प्रत्येक देशात बहुसंख्यांकांच्या धर्माला विशेष संरक्षण असते. भारतात मात्र असे संरक्षण ख्रिस्ती आणि इस्लाम पंथाला आहे.

२. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसच्या राजकारणामुळे भारत हिंदु राष्ट्राच्या स्वाभाविक अधिकारापासून वंचित आहे.

३. काँग्रेसचा हा हिंदु धर्मावरील सर्वांत मोठा आघात आहे. बुद्धीभेद आणि हिंदूंच्या धार्मिक आस्थांच्या संदर्भात भ्रम पसरवल्यामुळे भारताची वीर युवाशक्ती अजूनही भरकटलेली आहे. हे ओळखून भारताला धर्मनिरपेक्षतेच्या जोखडातून मुक्त करणे आणि भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी राष्ट्रजीवनाच्या सर्व अंगांमध्ये प्रयत्न करत रहाणे, हाच खरा पुरुषार्थ आहे.

४. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ज्यांच्याकडे सत्ता सोपवली गेली, ते मुळात स्वातंत्र्यसैनिक नव्हतेच; कारण जर ते असते, तर स्वतंत्र भारतात इंग्रजांचा ढाचा, इंग्रजीव्यवस्था कायम ठेवली गेली नसती. वेद, उपनिषदे यांना प्रतिष्ठा मिळाली असती.

५. हिंदूंचे दमन आणि अन्य धर्मियांना संरक्षण ही इंग्रजी नीती पुढे चालू ठेवली गेली नसती. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी केवळ युद्ध करणार्‍यांच्या किंमतीवर सौदेबाजी केली गेली. भारतियांची मानसिकता दास्यत्वाची ठेवली गेली.

६. आपल्याला हे चित्र पालटायचे असेल आणि आपल्याला क्रांतीकारकांचे वंशज म्हणवून घेणार असू, तर हिंदु राष्ट्रासाठी कटिबद्ध होणे आवश्यक आहे.

७. हिंदु राष्ट्र हा भारताचा स्वाभाविक अधिकार आहे. देहबल, धनबल, बुद्धीबल, विद्याबल असे आपल्यापैकी जे काही आहे, ते हिंदु राष्ट्रासाठी अर्पण करणे, हाच खरा पुरुषार्थ आहे.