विदर्भ राज्यांचा ध्वजारोहण व जबाब दो

0
634
महेन्द्र महाजन जैन / रिसोड
-वाशिम :-
विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीच्या वतीने 1 मे महाराष्ट्र दिनी स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुतळ्याला हारार्पण करण्यात  आला  युवा आघाडीचे विभागीय सचिव पवन राऊत यांच्या हस्ते विदर्भाचा झेडा फडकावून विदर्भ राज्याचे  ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणात वेगळ्या विदर्भावर ठाम असल्याचे सांगून वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. तसेच विदर्भ होण्यासाठी विदर्भवादी स्वत:चे बलीदान देण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत असे सांगीतले.
त्यानंतर समितीच्या वतीने निषेध सभा घेण्यात येवून या सभेत वेगळ्या विदर्भाचा विरोध करणार्‍या लोकप्रतिनिधींचा व राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला. त्यांनतर आंदोलनाच्या तिसर्‍या टप्प्यातील जबाब दो या आंदोलनाअंतर्गत जिल्हयातील आमदार, खासदार, व लोकप्रतिनिधींना भ्रमणध्वनी करुन वेगळा विदर्भ राज्य कधी देणार या बाबत जाब विचारण्यात आला.
या आंदोलनामध्ये युवा आघाडीचे विभागीय सचिव पवन राऊत, विदर्भवादी नेते दत्तरावजी धांडे ,जिल्हा अध्यक्ष विनायक जवळकर, विभागीय उपाध्यक्ष सौरभ गंगावणे, जनमंचचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, शेतकरी नेते नारायण विभुते,  विभागीय सरचिटणीस निखिल गवळी, शेषराव धांडे, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, सौरभ गायकवाड, पंकज गाडेकर, राजु चौधरी, सागर भिसडे, नारायण विभुते, अक्षय गोदमले, भुषण मोरे, शाम पांढरे आदी विदर्भवादी युवक व नागरीकांची उपस्थिती होती.