नांदुरा येथे अवैध दारु विक्रीवर धाड

0
777
Google search engine
Google search engine

टाकरखेडा/गजानन खोपे –

येथुन जवळच असलेल्या अमरावती तालुक्यातील नांदुरा येथुन अवैध दारु साठ्यावर धाड टाकुन २ हजार रुपयेचा दारु साठा जप्त करण्यात आला आहे.हि कारवाई वलगाव पोलीस स्टेशनने केली.
वलगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणा-या नांदुरा येथे अवैध दारुविक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.आज सकाळी ११ वाजता येथुन विलास मेश्राम यांच्या घरी धाड टाकुन ३५ पावट्या जप्त केल्या.याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.हि कारवाई पोलीस निरिक्षक श्री अनिल कुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी श्री धैर्यशिल कु-हेकर ,मंगेश लोखंडे यांच्या पथकाने केली.