संदीप शेंडे यांना जलयुक्त शिवार चा पत्रकारिता  पुरस्कार प्रदान

0
600


टाकरखेडा शंभु /संतोष शेंडे –

अमरावती- शासनाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये जिल्हा स्तरावर पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संदीप अशोकराव शेंडे यांना अमरावती विभागतुन तिसरा पुण्यश्लोक राजमाता जिजाऊ पुरस्कार, राज्यांचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात अमरावती विभागातील जलयुक्त शिवार अभियानाच्या परस्कारांचे बुधवारी वितरण करण्यात आले. यावेळी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, अकोला जिल्हय़ाचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, आमदार आकाश फुंडकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार अमित झनक, आमदार बळीराम सिरस्कार, बुलडाणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उमा पाटील, अकोला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्याताई वाघोडे, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अकोला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, अमरावतीचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदींसह विभागातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. यावेळी संदीप शेंडे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले. मागील तीन वर्षांपासून शासनाचे महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान गावागावांत यशस्वीरित्या राबविल्या गेल्यामुळे चांगला जलसाठा निर्माण झाला. त्यामुळे शेतक:यांना शाश्वत पाणी मिळण्यास मदत झाली आहे. शेतीच्या उत्पादनात वाढ होवून शेतक:यांच्या विकासाबरोबरच गावे समृध्द झाली आहेत. या सर्व चांगल्या गोष्टींना व्यापक प्रसिद्धी आणि याचबरोबर अभियानातीन उणीवांनाही व्यापक प्रसिद्धी देऊन सुधारणेच्या दृष्टीकोनातून प्रसार व प्रचार केल्याबद्दल संदीप शेंडे यांना सदर पुरस्कार देण्यात आला आहे