*प्रतिभावंत साहित्यिक एकनाथ पवाराची अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदावर निवड*

0
628
Google search engine
Google search engine
                      विशेष प्रतिनिधी :              
     
     विदर्भाच्या मातीला गौरवांकित  करणारा एक सृजनशील व तडफदार युवा व्यक्तिमत्व म्हणून ख्याती असलेले “विदर्भभूषण” अवार्ड सन्मानित प्रतिभावंत साहित्यिक तथा प्रसिद्ध चित्रपट गीतकार एकनाथ पवार यांची नामांकित असलेल्या अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रदेश  कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली.                           साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरद गोरे असून सरचिटणीस दशरथ यादव आहेत.  पवाराच्या निवडीने वैदर्भीय साहित्य कला व संस्कृतीचा वारसा अधिक गतिमान होणार.                                      पवाराच्या साहित्य क्षेत्रासह सामाजीक क्षेत्रातील कामगीरी अतिशय कौतुकास्पद आहे.            कविता लेखन करता करता ,आईच्या शब्दाने चित्रपट सृष्टितही त्याने पदार्पण केले.याशिवाय न्यायवंचित घटकाच्या पुनर्रत्थानासाठी त्याची “तांडेसामू चालो” ही लोकोत्तर संकल्पना अतिशय दूरगामी स्वरुपाची असून चिरंतन असणारी संकल्पना होय.               लेखणीला समर्पक प्रत्यक्ष कृतीची जोड देणारा साहित्यातला हा वैदर्भिय व्यक्तिमत्व नव्या पिढीला प्रेरणास्त्रोत ठरणारा आहे.                 मराठी साहित्य परिषदेने पवाराची निवड केल्याची माहिती आनंदकुमार शेंडे यांनी पत्राद्वारे दिली. वणी जि.यवतमाल येथे परिषदे मार्फत  २४ वे अ.भा.मराठी नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन केले असून प्रख्यात विचारवंत ऐड. पुरुषोत्तम खेडेकर यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेमार्फत आतापर्यंत आयोजित केलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद कवीवर्य नारायण सुर्वे, रा.र.बोराडे,विठ्ठल वाघ,जनार्दन वाघमारे,आ.ह.सालुंखे,इंद्रजीत भालेराव अशा विविध ख्यातनाम व्यक्तीमत्वाने भुषवलेले आहे,हे विशेष..!                                      साहित्य परिषद या नामांकित साहित्य संस्थेद्वारे साहित्याचा वारसा अधिकाधिक गतिशील करण्यात महत्वाचे योगदान आहे.पवाराच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातुन कौतुक होत आहे