शिववैभव किल्ले स्पर्धा 2017 बक्षीस समारंभ संपन्न

0
763
Google search engine
Google search engine


प्रतिनिधी /गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

अमरावती शिवसेना शहर प्रमुख व संवेदना सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र केवले यांच्या संकल्पनेतून अमरावती येथे 21 नोव्हेंबर टाऊन हॉल येथे भव्य शिववैभव किल्ले स्पर्धा 2017 संपन्न झाली.नरेंद्र केवले यांनी अमरावतीच्या 25 शाळांमध्ये जाऊन जवळपास 20,000 विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांची माहिती प्रोजेक्टर द्वारे slide शो च्या माध्यमातून दिली.हि स्पर्धा अ गट व ब गटात घेण्यात आली.अ गट पहिली ते चौथी व ब गट पाचवी ते दहावी असा होता.253 विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर व समर्पक किल्ले बनवून स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज ,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली.या राबविलेल्या कार्याचा उद्देशा बद्दल शिवसेना शहर प्रमुख नरेंद्र केवले यांनी प्रास्ताविक केले. यानंतर भक्ती पिसे या चिमुकल्या मुलीने अफझल खानाचा वध आपल्या छोट्या भाषणातून सांगितला .या कार्यक्रमात अमरावती मधील ज्येष्ठ पत्रकार श्री प्रदीप देशपांडे व प्रसिद्ध डॉक्टर श्री रणजित मांडवे यांचा हृद्य सत्कार श्री संजयजी बंड माजी.आमदार व जिल्हा प्रमुख शिवसेना तसेच महानगरप्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते करण्यात आला . कार्यक्रमाला सत्कारमूर्ती प्रदीपजी देशपांडे,डॉ.रणजित मांडवे ,सुनीलजी खराटे,राजेंद्रजी येते यांनी संबोधित केले. अध्यक्षीय भाषणात श्री संजय बंड यांनी उपक्रमाचे अभिनंदन करीत असे उपक्रम समाजकरिता व विद्यार्थ्यांकरिता किती आवश्यक आहे हे सांगितले .एकंदर या स्पर्धेत 253 विद्यार्थी व 25 शाळांचा सहभाग होता.गट पहिली ते चौथीमध्ये मंथन मणियार ,मोहनलाल साम्रा स्कूल याला तृतीय,कु.भक्ती पिसे,दीपा इंग्लिश स्कूल हिला द्वितीय ,व अथर्व पोळेकर ,स्वर्गीय लक्ष्मीकांत पसारकर मूकबधिर विद्यालय याला प्रथम बक्षीस मिळाले.
गट ब पाचवी ते दहावी यात यश बोरकर,वनिता समाज शाळा यास तृतीय,अथर्व पुंडकर ,माणिबाई गुजराथी स्कूल यास द्वितीय,तर कु.कृष्णा सराफ ,हॉलिक्रोस शाळा हिला प्रथम बक्षीस मिळाले. या व्यतिरिक्त रामकृष्ण विद्यालयाचा विद्यार्थी
पियुष मेश्राम याला ग्रामीण भागातून विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.याशिवाय चंद्रकांत पिंपळे,सुज्योत गोलडे,सावरी दहात,शिवांजली केवले,अदिती तिवारी,मधुसूदन भटकर,आदित्य ठाकूर,यश कोळेकर,यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली .
कार्यक्रमाचे सुरेख व यथोचित संचालन प्राध्यापक गार्गेय आवारे यांनी केले.
मंचावर शिवसेना महिला जिल्हा संघटिका मनीषा ताई टेम्भरे,वर्षाताई भोयर,विद्यार्थी सेना प्रमुख आशीष पुरोहित,प्रसिद्ध स्तंभकार साहेबरावजी घोगरे,राजाभाऊ मोरे,प्रसिद्ध उद्योजक सचिन वानखडे ,अध्यात्म क्षेत्रातील अभ्यासक श्री राजेंद्रजी येते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता निरंजन जोशी,नीरज सोळंके,रोहित गुजर,भूषण विजयकर,रोहन गुप्ता,नितीन पंढरीकर,पंकज देशमुख,उमेश वाढ,अभिषेक गौरकार,राजाभाऊ अक्कलवार,प्रकाशभाऊ बनते,सौरभ केवले,संदीपन इंगोल , कारण धोटे,महेश लाडके,अभिषेक दीक्षित,निषाद जोध ,कल्याणी विंचूरकर,नंदाताई सोनुने ,भातकुली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष शेंडे यांचा( बाचा ) व शेकडो शिवसैनिक व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या धारकाऱ्यांनी परिश्रम घेतले.