राष्ट्रिय चर्मकार महासंघच्यावतीने संत रविदास महाराज पुण्यतिथी साजरी

0
1060

प्रतिनिधी /संतोष शेंडे

टाकरखेडा संभु :-

राष्ट्रिय चर्मकार महासंघ,जिल्हा कार्यकारणीच्या वतीने श्री संत रविदास महाराज पुण्यतिथी व भारतीय संविधान दिन या दुहेरी कार्यक्रमाचे औचित्य साधुन टाकरखेडा संभु येथील जिल्हा कार्यालयात राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे हे होते.तर प्रमुख पावणे म्हणुन पोलीस पाटील अजय मोहकर,कृष्णराव मोहकर हे उपस्थित होते.यावेळी राष्ट्रिय चर्मकार महासंघाचे अमरावती जिल्हाध्यक्ष निलेश जामठे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पण करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाला जानराव मोहकर,श्रीकृष्ण डाखोडे,सुरेश मोहकर,दादाराव अंबाडकर,तुकाराम तायडे,नागोराव तायडे,पंजाबराव विरुळकर,देवराव चापके,जानराव तायडे,संजय जा. मोहकर,संजय भि.मोहकर,प्रफुल अंबाडकर,गोपाल तायडे,पंजाबराव पाचखडे,माजी उपसंरपच्या सौ.कल्पनाताई मोहकर,पुष्पाताई जामठे,कोमल मोहकर,छायाताई मोहकर,चंदाताई मोहकर,वृशाली डाखोडे,वेणुताई जामठे,कांन्ताताई डाखोडे,यशोदाबाई चापके आदीसह चर्मकार समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राम पंचायत सदस्या सौ.सोनाली जामठे यांनी,संचालन प्रकाश तायडे,आभार प्रदर्शन नागेश डाखोडे यांनी केले.