श्री.संत राजेश्वर महाराज सार्वजनिक वाचनालय येथे संविधान दिन साजरा

0
577
Google search engine
Google search engine

——————————————
प्रतिनिधी /संतोष शेंडे
टाकरखेडा शंभू –

भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभु येथे संविधान दिना निमित्य श्री. संत राजेश्वर महाराज वाचणालय येथे दिनांक २६/११/१७ रविवारला संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाकरखेडा संभु येथील पोलीस पाटील अजय मोहकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणुन सतिश पिगंळे,वाचनालयाचे संचालक अशोकराव शेंडे,किसनराव मोहकर हे होते.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटोचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अजय मोहकर हे होते.तसेच यावेळी भातकुली तालुकाप्रमुख निलेश जामठे,अशोक पिगळे,संजय भि. मोहकर, डिगाबंर ढेगळे,डिगाबंर मेहरे, पत्रकार संतोष शेंडे पंजाबराव विरुळकर,अनिल भालचक्र यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल लाडे,अनुप ढेगळे,मनोज मेश्राम यांनी परिश्रम घेतले.यावेळी गावकरी मडंळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.