ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती प्रीत्यर्ध रक्तदान शिबीर

0
1280
अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-
अचलपूर परतवाडा शिवसेना,युवा सेना व महिला आघाडी च्या संयुक्त विद्यमाने ह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन भव्य रक्तदान शिबीराने साजरा करण्यात आला.
    शिवसेना,युवा सेना व महिला आघाडी च्या वतीने २४ नोव्हेंबर रोजी स्थानीक उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करून ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी रुग्णालयाचे अधीक्षक डाँ.झाकीर,नगराध्यक्षा सुनिता फीसके,नगरसेवक नरेंद्र फीसके,गोवर्धन मेहरे,परतवाडा शहर प्रमुख किशोर कासार,अचलपूर शहर प्रमुख विनय चतुर,माणीक देशपांडे,प्रमोद भोंडे व विलास बेलसरे यांच्या उपस्थितीत डाँ.उकंडे व संदिप पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या टिम मार्फत असंख्य शिवसैनीक व युवकांनी रक्तदान शिबिरात सहभागी झाले.तसेच नगरसेवक गोवर्धन मेहरे यांनी आजपर्यंत ९० वेळा रक्तदान केल्याबद्दल नगराध्यक्ष सुनिता नरेंद्र फिसके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तत्पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले व शिबिरात असंख्य नागरीक व शिवसैनीकांनी रक्तदान केले.शिबिराचे यशस्वीतेसाठी बंडू काटे,मिलींद बेलसरे,नितीन भुयार,प्रविण लाडोळे,मनिष शर्मा,किशोर लांबाळे,गोपाल चापके व सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.