समान नागरी कायदा होईपर्यंत हिंदूंनाही ४ मुले असावीत ! – स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज

0
596
Google search engine
Google search engine

नुसती लोकसंख्या वाढवून काय उपयोग ? आताही देशात हिंदु बहुसंख्य आहेत; मात्र त्यांना धर्मशिक्षण नाही, त्यामुळे त्यांच्यात धर्मप्रेम नाही आणि म्हणून ते धर्माच्या बाजूने उभे रहात नाही ! असेच हिंदू पुढेही जन्माला आले, तरी त्यांचा हिंदु धर्मासाठी लाभ शून्यच आहे ! यापेक्षा देशातील हिंदूंना धर्मशिक्षण देऊन त्यांच्यात धर्मप्रेम जागृत करून त्यांना धर्मरक्षणासाठी सज्ज केले पाहिजे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे !

उडुपी – देशात समान नागरी कायदा येईपर्यंत प्रत्येक हिंदूलाही ४ मुले असावीत, असे मत हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी व्यक्त केले. ते येथील धर्मसंसदेत बोलत होते.

स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, ‘‘देशाच्या ज्या भागात हिंदू समाज अल्पसंख्य ठरतो, तिथे भौगोलिक असंतुलन निर्माण होते. हिंदूंची लोकसंख्या न्यून झाल्याने भारताला बर्‍याच भागावर पाणी सोडावे लागले आहे.’’

स्वामी गोविंददेव यांच्या आवाहनाचे समर्थन

स्वामी नरेंद्र नाथ यांनी ‘हिंदूंनी अनेक मुले जन्माला घालावीत’, या स्वामी गोविंददेव गिरी यांच्या धर्मसंसदेतील आवाहनाचे समर्थन केले. केवळ हिंदूंनीच का म्हणून २ मुलेच जन्माला घालावीत ? काही विशिष्ट लोकं २० मुले जन्माला घालत आहेत, तर हिंदूंनीही तितकीच मुले जन्माला घालायला हवीत, असे ते म्हणाले.