*धारणी तालुक्यातील घुटी येथे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१८ कार्यशाळा संपन्न !* – मेळघाटातील आदर्श गाव करण्याचा गावकऱ्यांनी केला संकल्प

0
566
Google search engine
Google search engine

*पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून घुटी गावातील शेतकरी ग्रेडेड बंड व कंटूर आखून पाण्याचे नियोजन करून करतात शेती !*

धारणी –

रुपेश वाळके / विशेष प्रतिनिधी –

संविधान दिनाचे औचित्य साधून घुटी गावात पाणी फौंडेशन वॉटर कप सातत्य स्पर्धा कार्यशाळा संपन्न…सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2017 मध्ये मेळघाटात तालुक्यातून प्रथम येऊन घुटी गावाने एकीचे बळ दाखविले..नुकतंच त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा पानी फौंडेशन टीम ला घुटी गावाला भेट दिल्यानंतर आला..स्व मेहनतीने श्रमदानातून, स्व खर्चने गावासाठी लोकांनी बांधलेले समाज भवन येथे कार्यक्रम पार पडला.. या करिता सर्व घुटी गावातील लोकांनी श्रमदान सहभाग घेतला. कुणी गोटे आणण्याकरिता ट्रॅक्टर दिला, तर कुणी शेतातील लाकूड फाटा, बास दिला.

या कार्यशाळेत वॉटर कप स्पर्धा बक्षीस रक्कम विनियोग आणि नियोजन संबधी पानी फौंडेशन कडून मिळलेले पत्राचे वाचन करण्यात आले… गावचा पानी ताळेबंद, वॉटर कप सातत्य स्पर्धा,शाश्वत शेती असा विषयावर चर्चा करण्यात आली..या कार्यशाळेत मेळघाटातील पाणलोट क्षेत्र अभ्यासक श्री संजय जवंजाळ यांनी ऑटो लेव्हल, हायड्रो मार्कर याचा वापर करून प्रत्यक्ष फुलचंद सावलकर याचे शेतीवर कंटूर आखणी करून दाखवत जमिनीचा उतार काढून कंटूर काढून पेरणी पद्धतीचे फायदे त्यातून वाचणारा वेळ, वाचणारे पाणी याचे महत्व पटवून सांगितले. मेळघाट ग्रामोन्नती बहू.संघ या आदिवासी संस्थेचे मौजीलाल भिलावेकर यांनी या कार्यशाळेत काहीच बाहेरच्या निविष्ठा विकत न आणता शेती का आणि कशी करावी याचे महत्व पटवून सांगितले.

या कार्यशाळेला पानी फौंडेशन चे समन्वयक धनंजय सायरे, रामेश्वर धांडे, रवींद्र बोदडे, गीता बेलपत्रे उपस्थित होते. तसेच घुटी गावचे ग्रामसेवक श्री नितिन गाणार हे सुद्धा शासकीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते..त्यांनी 2018 मध्ये वॉटर कप सातत्य स्पर्धा मध्ये भाग घेऊन घुटी गावाला असाच लोक सहभाग करून मेळघाटातील आदर्श गाव करू असे मत व्यक्त केले..