राष्ट्रसंतांचा  व्यासपीठावर राजकारण करु नये – जी.प गट नेते डॉ श्री सतीश वारजूकर

0
841
Google search engine
Google search engine

चिमूर / महेश कोडापे –

इंदिरा नगर येथील पुण्यतिथी कार्यक्रम

राष्ट्र संत तुकडोजी महाराजा चे ग्राम गीतेतील विचार आज च्या पिढीला देणे अत्यंत गरजेचे आहे युवकांनी विचार आत्मसात करावे ,धन, संपत्ती असणे समाधान नाही तर थोडं आध्यामत आत्मसात करणे गरजे चे आहे कोणतेही काम करीत असताना जाहीर न करता प्रथम काम करणे महत्वाचे असल्याचे सागत गुरुदेव च्या व्यासपीठावर राजकारन करु नये पुढच्या पिढीने राष्ट्रसंताच्या विचारांची गरज आहे जी प चंद्रपूर येथील आवारात राष्ट्रसत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे बाबा पुतळ्याची कल्पना माजी खासदार श्री नरेश पुगलीया यांनी कल्पना दिली होती परंतु सत्ता नसली तरी प्रयत्न करणार असल्याचे जी प गट नेते डॉ श्री सतीश वारजूकर यांनी सांगितले.

श्री गुरुदेव ग्रामीण विकास मंडळ च्या आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी ४९ वि च्या कार्यक्रमात जी प गट नेते डॉ सतीश वारजुकर बोलत होते यावेळी कांग्रेस तालुका अध्यक्ष माधव बिरजे , नगर परिषद गट नेते अब्दुल कदिर शेख नगरसेवक तुषार काळे ,नगरसेवक विनोद ढाकुंनकर, ग्रामसेवाधिकारी रामदास जांभुळे, हभप प्रा अशोक चरडे हभप खिरटकर महाराज आदी उपासक होते
दरम्यान रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वाटप करण्यात आले तसेच नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते तीन दिवसीय पुण्यतिथी कार्यक्रमातून सामुदायिक प्रार्थना ,ध्यान ,विदर्भ स्तरिय भजन स्पर्धा सहित विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी प्रा चरडे ,तालुका अध्यक्ष माधव बिरजे यांनी मार्गदर्शन केले.

संचालन इंद्रपाल सूर्यवंशी तर प्रास्ताविक राजेंद्र मोहितकर यांनी मंडळाची मागील व पुढची वाटचाल यावर माहिती दिली श्री गुरुदेव ग्राम विकास मंडळ इंदिरा नगर चे वतीने पुण्यतिथी कार्यक्रमात शेकडो गुरुदेव उपासक उपस्थित होते महा प्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले श्री गुरुदेव ग्राम विकास मंडळ चे पदाधिकारी नि परिश्रम घेतले