*अभाविप तर्फे 26/11 शहीदांना श्रदांजली व संविधान दिवस साजरा*

0
1075
Google search engine
Google search engine

अचलपूर: / श्री प्रमोद नैकेले –

२६/११ म्हटल की मुख्यत्वे दोन गोष्टी अाठवतात एक म्हणजे २६ नोव्हेंबर १९४९ ज्या दिवशी संपूर्ण भारतला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आणि दूसरे म्हणजेच २६ नोव्हेंबर २००८ ज्या दिवशी अत्यंत दुर्दैवी घटना घडली.
भारताचा आत्मा समजल्या जाणाऱ्या भारताची आर्थिक राजधानी मुंबई येथे आतंकवादी हमला झाला त्यात अनेक निरपराध लोकांचा जीव गेला व अातंकवादया सोबत लढता लढता आपले महाराष्ट्र पोलिसाचे जवान शहीद झाले हे अत्यंत निंदनीय घटना आहे .

त्या निरपराध लोकांच्या व शहीद पोलिस जवानाच्या आत्माला शांति मिळावी म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा अचलपुर-परतवाडा च्या वतीने गांधीपुल अचलपुर येथे शहीदाना मेंनबत्ती लावून व २ मी मौन बाळगुण श्रदांजलि अर्पण करण्यात आली यावेळेस मान्यवरातर्फे २६/११ च्या आठवणींना उजाळा देण्यात आला अभविप अचलपुर चे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक नैकेले सर यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ते म्हणाले की मुंबई वरील आतंकी हमला ही अत्यंत निषेधिय घटना आहे व पुढे अश्या घटना घड़नार नाही व आतंकी देशात घुसणार नाही याकरीता उपाययोजना करण्याची गरज आहे ,त्यानतर पं.गजानन शर्मा यांनी संपूर्ण देश पोलिस जवानाच्या पाठीशी आहे व संपूर्ण देश आज शहीद जवानच्या पाठीशी आहे व पोलिस आहेत म्हणून आपन सुरक्षित आहोत त्यामूळे पोलिसांकडे बघण्याचा समाजाच्या दृष्टिकोण बदलण्याची आवश्यकता आहे असे सांगितले.त्यानतर अभाविप विस्तारक आकाश सातपुते यांनी आपले पोलिस बांधव दिवसरात्र उन वारा पाऊस याचा विचार न करता जनतेची सेवा करत असतात त्यामुळे आपण सुरक्षित आहोत असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक शुभम काकडे नगर मंत्री अभाविप यांनी केले तर संचालन तेजस शेरकार अभविप कार्यकर्ता यांनी केले यावेळी अभविपचे गौरव अटलकर प्रसिद्धि प्रमुख, आदित्य ठाकरे महाविद्यालयीन प्रमुख ,किरण भोंडे कार्यालय मंत्री दिपक सोनोने सहप्रसिद्धि प्रमुख, पवन गझघाटे सहकार्यालय मंत्री, दिनकर मकोड़े सहमंत्री, हरीश चव्हाण, अक्षय पिहुलकर, ओम दापुरकर पोलिस बांधव शहरातील नागरिक आदि उपस्थित होते