लाखांदूर व पवनी येथे रोजगार मेळावा संपन्न

0
1352
Google search engine
Google search engine

भंडारा :-

रोजगार व स्वयंरोजगार धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार /स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नुकताच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पवनी व लाखांदूर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात औरंगाबाद, हैद्राबाद व भंडारा जिल्हयातील 20 उद्योजक उपस्थित होते.

एसआयएस इंडिया लि. हैद्राबादचे संजय शर्मा, एसआयएस इंडिया लि. हैद्राबादचे संजय शर्मा, गजानन बांते फेकॉरअलॉएस कार्पोरेशन लि. तुमसर, एमएमपी ॲकाडमी मारेगावचे हरिष चहांदे, सनफ्लॅग आयरन स्टील कंपनी भंडाराचे योगेश मस्के, अशोक लेलँड गडेगावचे रविशंकर साकोरे, ईलाईट ईलेक्ट्रॉनिक्स भिलेवाडाचे अनिल पाझारे, नव किसान बायो प्लांटेक लि. नागपूरचे सुमित तिवारी, डॉ. सुनिल मिश्रा सेफक्सप्रेस नागपूर, प्रख्यात उके बॉरच स्कील इंडिया तुमसर, डी. सपाटे, एप्लाईट ॲकडमी भंडारा, अरविंद रोकडे, प्रणय गजभिये,अमित गणेश दिप्टे, पुष्पराज चोपकर एलआयसी भंडारा, रामदास वलथरे, ग्लोबल रिच स्कील ट्रेनिंग औरंगाबाद, व शितल दुर्गे, उषा दुर्गे बहुउदे्देशिय संस्था नागपूर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आध्यक्षस्थानी लाखांदूरचे ठाणेदार बंसोड होते.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक शैलेश भगत यांनी रोजगार मेळाव्याच्या धोरणाविषयी माहिती देवून उपस्थित उमेदवारांना सद्यस्थितीत रोजगारांच्या संधी मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत करीता उमेदवारांनी रोजगार मेळाव्यामार्फत संधीचा योग्य लाभ घ्यावा, असे सांगितले. तसेच कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने कार्यान्वित केलेल्या www.mahaswyam.on या वेबपोर्टलबाबत माहिती दिली.
रोजगार मेळाव्यात एकूण 2 हजार 394 उमेदवार उपस्थित होते. उपस्थित उद्योजकांनी आपल्या कंपनीबाबत माहिती देवून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मेळाव्यात 1 हजार 190 उमेदवारांची रोजगाराकरीता प्राथमिक निवड उद्योजकांकडून करण्यात आली.