मोर्शी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा रिक्त पदामुळे सलाईनवर – तालुक्यातील ५९ रिक्त पदे तात्काळ भरण्यासाठी सौ वृषालिताई विघे यांचे शासनाला निवेदन  !

0
1690
Google search engine
Google search engine

मोर्शी तालुक्यातील रुग्णालयाला ‘रेफर टू’ अमरावती चा आजार !

रुग्ण वार्‍यावर : मोर्शी तालुक्यातील आरोग्य केंद्रांत सुविधांचा अभाव !

रूपेश वाळके – मोर्शी

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील डोंगरदर्‍यात वसलेल्या नागरिकांसाठी मोर्शी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा पूर्ण ढेपाळली असून रुग्णांना खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. लाखांवर लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात आरोग्याच्या पुरेशा सुविधा नाही. मोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयातही योग्य उपचार होत नसल्याची कायम ओरड आहे.

तालुक्यात मोर्शी येथे उपजिल्हा रुग्णालय आणि हिवरखेड , अंबाडा , नेर पिंगळाई येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य उपकेंद्रही निर्माण करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी रुग्णालयाची सुसज्ज इमारत आणि डॉक्टर व कर्मचार्‍यांसाठी निवासस्थाने बांधली आहे. परंतु काही अपवाद वगळता बहुतांश डॉक्टर व कर्मचारी बाहेर गांवा वरुण जाणे-येणे करतात . त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. रात्रीच्या वेळी एखादी घटना घडल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपायाशिवाय कुणीही भेटत नाही. त्यामुळे रुग्णाला खासगी रुग्णालयात आणावे लागते. यात रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता असते. तालुक्यात आरोग्य यंत्रणा ढेपाळल्याने याचा सर्वाधिक फायदा तालुक्यात सक्रिय बोगस डॉक्टर घेत आहे. गावागावांत या डॉक्टरांचे पेव फुटले आहे. परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.

मोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण भागातील रोज शेकडो रुग्ण तपासणीसाठी मोठय़ा आशेने येतात. परंतु एकही डॉक्टर येथे वेळेवर येत नाही. रुग्णांना डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते. या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा अभाव असून रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाही त्यामुळे रुग्णांनाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे . मोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांना औषधे आणि इंजेक्षण सुद्धा बाहेरून आणावे लागत असून रुग्णांसाठी येथे कोणतीही सुविधा नाही.

सध्या विविध आजाराचे गावागावांत रुग्ण आढळून येत आहे आहे. अशावेळी आरोग्य यंत्रणा उपलब्ध नसल्यास गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो . अशीच अवस्था इतर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेला सुदृढ करावे, आणि डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तात्काळ भरावी अशी मागणी माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालिताई प्रकाशराव विघे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे आहे. मोर्शी तालुक्यातील रुग्णालयात अनेक वर्षांपासून सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. या ठिकाणी औषधांची नेहमीच टंचाई जाणवते. अनेकदा रुग्णांना बाहेरून औषधी आणावी लागते, तर एक्स-रे व इतर चाचण्याही वेळेवर होत नसल्याची रुग्णांची कायम ओरड असते. यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आणि उपजिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्यामुळे रुग्णांना ‘रेफर टू’ अमरावती केल्या जात असून हा एक प्रकारचा आजार निर्माण झाला असल्याचे चिन्ह दिसत आहे . अपुऱ्या सोई सुविधांमुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्याची घाई उप जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना करावी लागते , तर मोर्शी तालुक्यातील रुग्णालयातून रुग्णांना अमरावती अथवा नागपूर रेफर केले जाते.
मोर्शी तालुक्यातील परिसरातील जवळपास लाखो नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने मोर्शी येथे उप जिल्हा रूग्णालय सुरू करण्यात आले. मात्र या रूग्णालयात वर्ग १ चे वैद्यकीय अधीक्षक, वर्ग २ चे वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचार्‍यांची अनेक पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहे.

त्यामुळे कार्यरत डॉ. व कर्मचारी रूग्णसंख्येच्या तुलनेत सेवेसाठी कमी पडत आहेत. परिणामी उपजिल्हा रूग्णालयाची आरोग्य सेवा प्रचंड गंभीर झाली असल्याचे दिसून येत आहे.
*ग्रामीण भागात आरोग्याच्या शासकीय सुविधा नाहीत. शिवाय खासगी आरोग्यसेवाही उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिक आरोग्य सुविधेसाठी याच रूग्णालयात येतात. मात्र या ठिकाणी डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे येथे आलेल्या रूग्णांवर वेळेवर पुरेसा औषधोपचार होत नाही. परिणामी येथे आलेल्या अनेक रूग्णांना अमरावती जिल्हा सामान्य रूग्णालय गाठावे लागते. यामुळे बहुतांश रूग्णांवर प्रवासापोटी आर्थिक भुर्दंड बसतो.
मोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांची , डॉक्टरांची , आरोग्य सेवक , स्टाफ नर्स , सहायक अधीक्षक , कक्ष सेवक , सफाई कामगार अशी अनेक पदे वर्षभरापासून रिक्त आहेत. रिक्त पदासंदर्भात अनेक नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यात. मात्र जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने येथे रिक्त पदे भरण्याबाबत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्य विभागाप्रती प्रचंड रोष व्यक्त केला आहे. राज्य शासनाने तसेच लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्यकडे लक्ष देऊन मोर्शी येथील उपजिल्हा रूग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी यांची रिक्त पदे तात्काळ भरून आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुका प्रमुख तथा माजी महिला बाल कल्याण सभापती सौ वृषालिताई प्रकाशराव विघे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मोर्शी तालुक्यात आरोग्य विभागाची रिक्त असलेली पदे !

मोर्शी तालुक्यातील उप जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ५९ पदे रिक्त असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ढेपाळली आहे . मोर्शी तालुक्यात हिवरखेड , अंबाडा , नेर पिंगळाई या आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी ३ पदे , आरोग्य सहायक ९ , आरोग्य सेवक २० , परिचर ११ , कनिष्ठ सहायक २ , उप जिल्हा रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधीक्षक १, वैद्यकीय अधिकारी ३ , वर्ग तीनची ५ पदे , वर्ग चारची ४ पदे , असे मोर्शी तालुक्यातील एकून ५९ पदे रिक्त आहेत .