ईद ए मिलादुन्नबी निमित्य ग्रामिण रूग्णालय, मुक बधीर विद्यालयात फळ वाटप ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ चे आयोजन

0
786

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

जगाला एकेश्वरवादाचा सिध्दांत देणारे, जात व वर्ण विरहीत धर्म-समाज रचनेची व्यवस्था प्रदान करणारे, अस्पृष्यतेचा धार्मिक सिध्दांत नाकारणारे, समता व समानतेचा पुरस्कार करणारे, भेदाभेद दूर करून श्रीमंत-गरीब, गोरा-काळा, वरिष्ट-कनिष्ट, गुलाम-सुलतान सगळ्यांना समान रांगेत ऊभे करणारे इस्लाम धर्माचे पैग़ंबर मोहम्मद (स.अ.स.) यांच्या जन्मदिन अर्थात ईद ए मिलादुन्नबी चांदुर रेल्वे शहरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्याने शहरात ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे लाडु व फळवाटप करण्यात आले.

ईद ए मिलादुन्नबी निमित्य शहरातील आय. टी. आय. जवळील निवासी मुक बधीर विद्यालय, ग्रामिण रूग्णालय, सोनगाव रोडवरील मुकबधीर विद्यालयात लाडु, फळांचे वाटप ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ तर्फे करण्यात आले. यावेळी अब्दुल गफ्फार, अनवर खान, एजाज सौदागर, अकबर सौदागर, मोसीन खान, इम्रान सौदागर, परवेज मुर्शरफ, मोहम्मद इम्रान सौदागर, नदीम सौदागर, सैय्यद उमेर, मोहम्मद दानिश, युसुफ सौदागर, आसिफ खान, नवाज कुरैशी, शेख आवेज, मोहम्मद साकीब, अब्दुल्ला कुरैशी, कासिम कुरैशी, मोहम्मद आशिक, आदील सौदागर, रौशन शाह, मोहम्मद अन्सार, मोहम्मद निसार, बाबर सौदागर, हारीस सौदागर, अशफाक खान, सलीम सौदागर, इलियास खान, शहेजाद खान आदी युवक प्रामुख्याने उपस्थित होते.