माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तिवसा येथे शेतकरी मेळावा, मार्गदर्शन शिबीर संपन्न

0
908
Google search engine
Google search engine

तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल साठवणूक करिता वखार महामंडळा च्या भव्य गोडाऊन चे लोकार्पण संपन्न

तिवसा:-

देशाच्या कणखर व आयर्न लेडी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता त्यांच्या शेतमाल हमीभाव मिळे पर्यंत साठवून ठेवता यावा किंवा शासकिय हमीने शेतमाल तारण पतपुरवठा व्हावा या उद्देशाने अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मागणी असलेल्या राज्य वखार महामंडळा च्या भव्य अशा ०६ लाख मेट्रिक टन क्षमतेच्या गोडाऊन भव्य लोकार्पण सोहळा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितिमध्ये थाटात संपन्न झाला.

या लोकार्पण सोहळ्याचे व शेतकरी मार्गदर्शन मेळ्याव्याचे अध्यक्ष माजी आमदार भैयासाहेब ठाकूर, कार्यक्रमाच्या उदघाटक आमदार यशोमतीताई ठाकूर, प्रमुख शेती मार्गदर्शक व भारत सरकार अ. ग्रा.औ.सं. संचालक म्हणून डॉ. श्री.पी.बी.काळे साहेब, जि प शिक्षण व बांधकाम सभापती श्री जयंतराव देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बँक संचालक श्री सुरेशराव साबळे, जि प सदस्य सौ पूजा सं आमले, जि प सदस्य श्री अभिजित बोके, तिवसा पंचायत समिती उपसभापती श्री लुकेश केने, तिवसा नगराध्यक्ष सौ राजकन्या खाकसे, तिवसा न प उपाद्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव सतिशराव वानखडे, माजी जि प सभापती दिलीपराव काळबांडे, वखार महामंडळ उपव्यवस्थापक श्री चोरे साहेब, पंचायत समिती सदस्य श्री मंगेश भगोले, पं स सदस्या सौ उज्वला अ पांडव, पं स सदस्या सौ रंजना स पोजगे, माजी बाजार समिती सभापती श्री संजयराव वै देशमुख, तालुकाध्यक्ष श्री मुकुंदराव देशमुख, बाजार समिती सभापती श्री रामराव तांबेकर, उपसभापती श्री कमलाकर वाघ, खरेदी विक्री संघ चे अध्यक्ष श्री गजानन अळसपुरे, उपाद्यक्ष श्री दिलीपराव वानखडे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री खर्चान साहेब, कृषि विभागाचे श्री देशमुख साहेब, तालुका कृषि अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला तालुक्यातील हजारो शेतकरी व शेकडो पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमात फवारणी मुळे मृत पावलेल्या शेकडो शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहून उपस्थित शेतकऱ्यांना फवारणी करतांना चे मास्क किट वाटप सुरक्षा म्हणून वाटप करण्यात आले, गुलाबी बोंड अळी मुळे त्रस्त, हमीभाव न मिळाल्याने त्रस्त, शेतकरी वर्गाला या मेळाव्यात मौलिक मार्गदर्शन मिळाले.

सोबतच नवनियुक्त ग्राम पंचायत सरपंच यांचे सत्कार व खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष यांचे सत्कार भैयासाहेब ठाकूर, व आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

वखार महामंडळा चे भव्य असे वेयर हाऊस तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार यशोमतीताई ठाकूर यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन बाजार समिती संचालक श्री दिनेश साव, तर आभार प्रदर्शन कृ ऊ बा स सचिव सौ ज्योती रोंघे यांनी केले.