*राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांदयावर घेवून श्री जयंत पाटील यांचा पाच किलोमीटरचा प्रवास…*

0
603
Google search engine
Google search engine

यवतमाळ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी पदयात्रेमध्ये पक्षाचा भलामोठा झेंडा खांदयावर घेवून पाच किलोमीटरचा प्रवास केला. जयंत पाटील यांनी या वयामध्ये पदयात्रेमध्ये खांदयावर घेतलेला झेंडा कार्यकर्त्यांमध्ये एक कौतुकाचा विषय होताच शिवाय त्यांच्या जिद्दीची दाद देणारा होता.

चापर्डा येथून कळंबपर्यंतच्या पदयात्रेमध्ये जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा भलामोठा झेंडा खांदयावर घेतला होता.कळंब येथे झालेल्या सभेच्यावेळी त्यांनी हा झेंडा खाली ठेवला. पदयात्रेमध्ये त्यांनी खांदयावर झेंडा घेत सरकारविरोधी जोरदार घोषणाही दिल्या. त्यांच्यासमवेत खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री अनिल देशमुख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान,माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार प्रकाश गजभिये, आमदार विदया चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,माजी आमदार संदीप बजोरिया,जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,महिला जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,विदयार्थी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.