नागपूर – अमरावती रोड वर भीषण अपघात -ट्रक अॅम्ब्युलन्सवर धडकला, चार ठार, पाच गंभीर

0
655
Google search engine
Google search engine

नागपूर : अमरावती महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एका ट्रकने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आई आणि मुलाचा समावेश असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.
एका आजारी मुलाला अकोला मधून रुग्णवाहिकेतून मेयो हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. या रुग्णवाहिकेला पहाटे साडेतीनच्या सुमारास कोंढाळीजवळ विरुद्ध दिशेकडून भरधाव येणा:या एका ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील चार जण जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मुलगा, आई आणि इतर दोघांचा समावेश आहे. तर मुलाचे वडील जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
——-

सर्व मृतदेह व जखमींना मेयो रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे