महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये स्वच्छ भारत अभियानाला तिलांजली – एटीएमजवळ स्लीपचा सडा -एटीएमची दुरावस्था

0
619
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद  खान) 
      स्वच्छतेसंदर्भात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता भारत अभियान देशभर राबविण्याचे आवाहन केल्यानंतर विविध शहरांमध्ये मोहीम राबविली जात असली तरी त्यात सातत्य दिसून येत नाही. अशातच शहरातील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये स्लीपचा सडा निर्माण झाल्यामुळे या  स्वच्छता अभियानाचा बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
       शहरात बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र अशा चार बँकांचे एटीएम आहे. बँकेतुन पैसे काढल्यानंतर खात्यात शिल्लक राहिलेल्या पैशांची एक प्रिंटेट स्लीप येते. दररोज अनेक ग्राहक एटीएममधुन पैसे काढत असल्यामुळे एटीएमजवळ स्लीपचा कचरा निर्माण होतो. हा कचरा दररोज उचलने गरजेचे असतांना मात्र बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम जवळील कचरा उचलत नसल्यामुळे तेथे मोठा ढीग निर्माण झाला आहे. एटीएमची देखरेख खाजगी कंपनीकडे असुन खाजगी कंपनीने एटीएम वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. एटीएममध्ये अनेकवेळा पैसे उपलब्ध सुध्दा नसतात.
     एटीएम सुरू अनेक वर्ष झाले असुन अद्यापही येथे सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. एटीएमची देखरेख खाजगी कंपनीकडे असली तरी महाराष्ट्र बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
एटीएम मशीनच्या बटनांवरील नंबर गायब
या महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मशीनच्या बटनांवरील नंबर गायब झाले आहे. अनेकांना कोणते बटन कशाचे आहे हे सुध्दा समजत नाही. तसेच एटीएमच्या स्क्रीनवर रात्रीच्या वेळी वरील लाईटचा थेट प्रकाश पडत असल्यामुळे रात्री पैसे काढणेसुध्दा कठीण झाले आहे. यासर्व प्रकारामुळे देखरेख करणाऱ्या खाजगी कंपनीने मशीनवरील बटन सांगण्याकरीता एखाद्या ज्योतिष्याची नियुक्ती केल्यास ग्राहकांवर उपकार होतील असे मत शहरातील प्रा. प्रसेनजित तेलंग यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन व्यक्त केले.
बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या खोलीचा दरवाजा नादुरूस्त
राम नगर परीसरात असणाऱ्या बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन असलेल्या खोलीचा स्लाईडींग दरवाजा नादुरूस्त असुन दरवाजा उघडते वेळी किंवा बंद करते वेळी मोठ्याने कर्कश आवाज येतो. या प्रकारामुळे ग्राहकांत चिड निर्मान होत आहे.  तसेच या एटीएमला सुध्दा सुरक्षा रक्षकाची अद्यापही नेमनुक करण्यात आलेली नाही.