आमदार श्री बच्चू कडू यांना फोनवर धमकी देणाऱ्यावर लोकमत चौकात सिनेस्टाईल प्राणघातक  हल्ला 

0
1164
Google search engine
Google search engine

 

कायदा व सुव्यवस्थेची पोलखोल ….भर चौकात हल्ला 

 

नागपूर:- प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार श्री बच्चू कडू यांना फोनवर मारण्याची धमकी देणाऱ्या मनसे कार्यकर्त्यास प्रहार कार्यकर्त्यांनी चांगलेच बदळून काढले. यानंतर एका वाहनातून त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली. पोलिसांनी काही मिनिटांमध्येच अपहरणकर्त्यांचे वाहन पकडले. एका आरोपीला वाहतूक पोलिसांनी पकडले, तर इतर पसार होण्यात यशस्वी झाले. अटकेतील आरोपी प्रहार संघटनेचा नागपूर शहरप्रमुख तुषार  पुंडकर आहे. फरार असलेल्या आरोपींमध्ये किशोर देशमुख, अविनाश गायसुंगर, निखिल गावंडे आणि सैय्यद अली उर्फ गवर्नर यांचा समावेश आहे. जखमी संतोष बद्रे याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या तक्रारीवर पोलिस रात्री उशिरापर्यंत प्रकरण दाखल करण्याची कारवाई करीत होती. संतोष अमरावतीमध्ये मनसेचा महानगर प्रमुख आहे. पोलिसांनी आरोपींची एमएच-30/एएफ-4727 क्रमांकाचे बोलेरो वाहन जप्त केले आहे.*

उल्लेखनिय म्हणजे, काही दिवसांपूर्वी आमदार कडू यांनी ठाण्यातील एक प्रेम कॉन्फ्रंसमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर टिका केली होती. वृत्तपत्रांमध्ये ही बातमी वाचल्यानंतर मनसे शहरप्रमुख श्री संतोष बद्रे ने  2 दिवसांपूर्वी आमदार श्री कडू यांना फोन केला. त्यांना धमकी दिली की, मनसे अध्यक्षांवर टिका करणे महागात पडेल. त्याने अमरावतीला आल्यास मारण्याची उघड धमकी दिली होती. याची ऑडियो क्लिप वाट्सअॅपवर व्हायरल झाली. तुषार पुंडकर प्रहारचा कार्यकर्ताच नाही तर कडू यांचा नातेवाईकही आहे. त्याने संतोषला फोन करून कडू यांना दिलेल्या धमकीबद्दल माफी मागण्यास सांगितले.

शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. तुषार आणि त्याच्या साथीदारांनी संतोषला मारहाण करण्यास सुरूवात केली. तुषार सोबत आलेला त्याचा सोबती मारहाण होताना पाहून तेथून पसार झाला. दरम्यान आरोपींनी संतोषला जबरीने वाहनात बसविले. यानंतरही त्यांची मारहाण सुरूच होती. आरोपी त्याला आपल्या सोबत अमरावतीला घेऊन जाणार होते, मात्र काही नागरिकांनी या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. बोलेरो वाहनातून अपहरणाची माहिती मिळताच पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी अधिकाऱ्यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. केवळ 5 मिनिटांमध्ये धंतोली ठाण्याच्या चार्लीने बोलेरोला कृपलानी वळणावर थांबविले. वाहन थांबताच आरोपींनी पळ काढला. यावेळी तेथे वाहतूक कर्मचारी सुरेश राठोड, स्वप्निल नरोडे आणि योगेंद्र तरोडे हे कर्तव्यावर होते. आरोपींना पळताना पाहून त्यांनी त्यांचा पाठलाग केला. तुषार त्यांच्या हाती लागला. याबाबत माहिती मिळताच एसीपी सोमनाथ वाघचौरे आणि धंतोलीच्या ठाणेदार सीमा मेहंदाळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिस इतर आरोपींचा शोध घेत होती.

 

 

v