टाकरखेडा शंभू झाले हागणदारीमुक्त – उघड्यावर शौचालय  बसणा-यावर होणार कारवाई

0
530
Google search engine
Google search engine

टाकरखेडा शंभू / संतोश शेंडे –

स्वच्छ भारत अंतर्गत टाकरखेडा संभु येथे राबविलेल्या शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याने हे गाव हगणदारीमुक्त घोषीत करण्यात आले आहे.त्यामुळे यानंतर या गावात कोणीही उघडयावर शौच्छास बसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही केल्या जाणार असल्याचे आदेश सरपंच ,सचिवांकडुन देण्यात आले आहे.जिल्ह्यात ३१ डिसेंबर पर्यत शौच्छालय बांधकामाचे उद्दीष्ट सीईओ नी तालुका स्तरावर दिले आहे.याचा आढावा सीईओ स्वत: तालुका स्तरावर जावून घेत आहे.संपुर्ण जिल्हा ३१ डिसेंबर पर्यत हागणदारीमुक्त करावयाचा आहे.तसा निर्धार करण्यात आल्याने टाकरखेडा संभु गावाला देखील शिल्लक राहीलेल्या ४१६ शौच्छालयाचे उद्दीष्ट दिले होते.हे उद्दीष्ट सरपंच व सचिवाच्या माध्यमातुन पुर्ण करण्यात आल्याने टाकरखेडा संभु ला हागणदारी मुक्त म्हणून पंचायत समिती ने घोषित केले आहे. त्यामुळे तालुका स्तरावर गावातील पदाधिका-याचे कौतुक करण्यात येत आहे. त्यामुळे गावात यानंतर कोणीही उघड्यावर शौचास बसणार नाही याची खबरदारी ग्रामपंचायत घेत असुन याबाबत चौका चौकात फलक लावण्यात आले आहे. उघड्यावर शौचास बसणा-यास दंड व शिक्षा ठोठावली जाणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.