मुस्लीम कब्रस्थानच्या वॉलकंपाऊंडचे काम त्वरीत सुरू करा – दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुपची मागणी <<>>अल्पसंख्यांच्या मागण्यांवर दुर्लक्ष

0
585
Google search engine
Google search engine

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 

शहरातील मुस्लीम कब्रस्थानच्या वॉलकंपाऊंड व लोखंडी गेट बसविण्याचे काम त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी ‘दि ग्रेट टिपु सुलतान’ ग्रुपच्या व शहरातील युवकांनी शुक्रवारी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष शिट्टु सुर्यवंशी यांना निवेदनाव्दारे केली आहे.
अमरावती रोडवर मुस्लीम कब्रस्थान असुन या कब्रस्थानच्या विटांचे वॉलकंपाऊंड आणि लोखंडी गेट बसविण्याची मागणी अनेक दिवसांपासुन केली आहे. सन २०१४ ते २०१७ या तीन वर्षांच्या अल्पसंख्यांक निधीतुन सदर काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु सन २०१७ संपत असतांनासुध्दा अद्यापही याबद्दल कोणतीही प्रक्रीया सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे काम कधी सुरू होणार असा प्रश्न सुध्दा निर्माण झाला आहे.

 

 

यामुळे आक्रमक झालेल्या ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’ च्या युवकांनी शुक्रवारी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष शिट्टु सुर्यवंशी यांना निवेदन दिले. यावेळी नगराध्यक्ष सुर्यवंशी यांच्या सोबत युवकांनी चर्चा केली असता नगराध्यक्षांनी सांगितले की सदर काम हे पहिलेच विचारधीन असुन अल्पसंख्यांक निधी मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही. या निधीसाठी प्रयत्न करीत असुन लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक नगर परीषदेत कॉंग्रेसची सत्ता असतांना सुध्दा विकासकामांबद्दल अल्पसंख्यांक असणाऱ्या मुस्लीम घटकावर अन्याय होत असल्याची खंत ‘दि ग्रेट टिपु सुलतान ग्रुप’च्या युवकांनी व्यक्त केली. तसेच रखडलेला अल्पसंख्यांक निधी शक्य तेवढ्या लवकर प्रयत्न करून आणण्याची ही मागणी करण्यात आली. या निवेदनाची प्रत आमदार विरेंद्र जगताप यांना देण्यात आली.
निवेदन देतेवेळी बादर खॉन, परवेज मुशर्रफ, इम्रान सौदागर, मोहम्मद युसुफ, सैय्यद उमेर, मोसीन खॉन, मोहम्मद नदीम, मोहम्मद इम्रान, मोहम्मद आसिफ, मोहम्मद अब्दुला, परवेज आदील, शोऐब बेग, इरशाद शेख, शहेजाद खान यांसह अनेक मुस्लीम युवक उपस्थित होते.