१२ डिसेंबरला भारतबंदचे आवाहन – नक्षल्यांनी मोबाईल टॉवर जाळला

0
733
Google search engine
Google search engine

गडचिरोली / विशेष प्रतिनिधी -:

आताच जवानांनी चकमकीत ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर चवताळलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा विध्वसंक कारवाया करणे सुरु केले आहे काल रात्री एटापल्ली तालुक्यातील रोपी येथील BSNL चे मोबाईल टॉवर व अन्य सामग्री जाळून नक्षवाद्यांनी टाकली आहे.२ डिसेंबरपासून नक्षल्यांचा पीएलजीए सप्ताह सुरु झाला. या सप्ताहादरम्यान सी-६० पथकाच्या जवानांनी ६ डिसेंबर रोजी सिरोंचा तालुक्यातील कल्लेड येथील जंगलात ७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मात्रयामुळे संतापलेल्या नक्षल्यांनी काल एटापल्ली तालुक्यातील रोपी येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरला आग लावली. काल रात्री ५० ते ६० सशस्त्र नक्षलवादी रोपी येथे गेले. त्यानंतर त्यांनी गावातच असलेल्या टॉवरला आग लावली.

टॉवरसह डीटीएस, बॅटरी व अन्य महत्वाची सामग्रीही जळाल्याने ती निरुपयोगी झाली. यामुळे BSNL चे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच हे टॉवर उभारण्यात आले होते. नक्षल्यांनी शेजारीच एक बॅनर लावले असून, १२ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे.

‘हिंदू धार्मिक उन्माद के खिलाफ कार्यवाही सप्ताह,

न यहॉ राष्ट्रवाद चलेगा,

न मनु का राज चलेगा,

लोगों को जबरदस्ती हिंदू बनाना बंद करो, समाज का भगवाकरण बंद करो’ असा मजकूर बॅनरवर लिहिलेला आहे. या घटनेमुळे पुन्हा नक्षलवादी मोठ्या कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे