*प्रा. श्याम मानव यांचे उद्या 13 ला अमरावती येथे जाहीर व्याख्यान*

0
765
Google search engine
Google search engine

अमरावती :-

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीव्दारा राज्यभर सुरू असलेल्या संत गाडगेबाबा प्रबोधन अभियाना अंतर्गत व्याख्यान संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन , मोर्शी रोड अमरावती येथे दि. 13 डिसेंम्बर 2017 रोजी साय. 6 वाजता वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयांवर अ. भा. अंनिसचे संस्थापक संघटक व PIMC, महाराष्ट्र शासनाचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव

यांचे जाहिर व्याख्यान होणार आहे.
सदर व्याख्यानात

*1. खरे संत आणि ढोंगी बाबा कसे ओळखायचे?*
*2. स्त्रिया बाबांच्या नादी का लागतात?*
*3. सर्वच बाबा स्त्रियांचं लैगिक शोषण करतात का?
*4. स्त्रियांना यातून वाचविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यात काय तरतुद आहे?*
या विषयांवर चमत्कार प्रात्यक्षिकांसह सखोल मार्गदर्शन होणार आहे. या व्याख्यानाला जनतेने खासकरून महिलांनी मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे