भंडारा जिल्ह्यात 53 हजार 111 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

0
640
Google search engine
Google search engine

• छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
• 30 हजार 415 शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

भंडारा :-

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात राज्यातील ऐतिहासिक कर्जमाफी अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 53 हजार 111 शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश असून 20 हजार 500 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात 20 हजार 500 शतेकरी कर्जमाफी अतर्गंत 2 हजार 196 शेतकऱ्यांना वन टाईम सेटलमेंट लाभ मिळणार आहे. 30 हजार 415 शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात साधारण 41 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने 19 हजार कोटी रुपयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली. या योजनेंतर्गत राज्यभरात 77 लाख अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंतर्गत डुप्लिकेशन झालेले खाते दूर करुन 69 लाख खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली त्यापैकी जवळपास 41 लाख खात्यांमध्ये कर्जमाफीचे अनुदान देण्यासाठी राज्य शासनाकडून बँकांकडे सुमारे 19 हजार कोटी रुपये इतका निधी हस्तांतरित करण्यात आला. जे शेतकरी पात्र होते पण अर्ज केला नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला मदत मिळेपर्यंत ही योजना सुरु ठेवली जाईल.
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची ही योजना कृषि व्यवस्थेला बळ पुरवणारी ठरली आहे. या योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रुपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांपर्यत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात आले आहे. योजनेच्या गतिमान व पारदर्शक कार्यवाहीसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारी जिल्हा सहकारी बँक व विविध राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. ऑनलाईन प्रक्रियेसाठी अद्ययावत यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे देशातील आजवरची सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी गतीने होण्यास मदत झाली आहे.
माझ्यावर 1 लाख 43 हजार रुपयांचे कर्ज होते. सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सर्व कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे माझ्यावरील कर्जाचे भार मोकळे झाले. या बद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. अशी प्रतिक्रीया सिल्ली, ता.जि. भंडारा येथील शेतकरी पिसाराम शंकर चोपकर व्यक्त केली. डोडमाझरी, ता.जि. भंडारा येथील राजू भागवत नरडंगे म्हणाले की, माझ्यावर 52 हजार 932रुपयांचे कर्ज होते. सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत सर्व कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे माझ्यावरील कर्जाचा भार मोकळा झाला आहे. कर्जाच्या मोठया संकटातून बाहेर पडलो असून या बद्दल मी सरकारचे आभार व्यक्त करतो.
माझ्यावर 22 हजार 400 रुपयांचे कर्ज होते. सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सर्व कर्ज माफ करण्यात आले. आता मी नव्याने आपले जीवन जगू शकतो या बद्दल मी शासनाचाआभारी असल्याची भावना पांढराबोडी, ता.जि. भंडारा येथील शेतकरी रवी सोविंदा पुडके यांनी व्यक्त केली. सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत सर्व कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे माझ्यावरील कर्जाचा भार आता उतरला आहे. शासनाने कर्जमाफी योजनेत खूप मोठा दिलासा मिळाल्याचे पिसाराम शंकर चोपकर, सिल्ली, ता.जि. भंडारा यांनी सांगितले. सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत कर्ज माफ करण्यात आले. त्यामुळे माझ्यावरील कर्जाचा डोंगर उतरला आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार आहे. या बद्दल मंगल गुलाब भोतमांगे, आमगाव, ता.जि. भंडारा यांनी शासनाचे आभार व्यक्त केले.