परभणी जिल्ह्यातील 53 हजार 883 शेतकऱ्यांना 258 कोटी 58 लाख रुपयांची कर्जमाफी

490
जाहिरात

परभणी :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गंत परभणी जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बॅक,ग्रामीण बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या एकुण 53 हजार 883 खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 258 कोटी 58 लाख रुपये शासनाने वर्ग केले असल्याची माहिती परभणीचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री.गणेश पुरी यांनी दिली.
राज्य शासनाने दिनांक 28/06/2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सन 2015-16 या वर्षात घेंतलेल्या पीक कर्जाची दि 30/06/2016 पर्यन्त पुर्णत: परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनी सन 2016-17 वर्षात घेतलेल्या कर्जाची रक्कम दि.30/06/2017 पुर्णत: परतफेड केल्यास त्यांना सन 2015-16 या वर्षातील पुर्णत: परतफेड केलेल्या पीक कर्जाच्या 25 % किंवा रुपये 25,000/- पर्यन्त जी कमी असेल ती रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल मात्र ही रक्कम किमान रुपये 15,000/- असेल.तथापी शेतकऱ्यांनी परतफेड केलेली रक्कम रुपये 15,000/- पेक्षा कमी असल्यास अशी संपुर्ण रक्कम शेतकऱ्यांना शासनामार्फत देण्यात येईल असे घोषित केले आहे. म्हणजे सदर अटी नुसार प्रोत्साहान रक्कमेचा लाभ मिळविणेसाठी सन 2016-17 या वर्षात घेतलेल्या कर्जाची परतफेड दि. 30/06/2017 पर्यंत करणे बाबत सदर शासन निर्णयात उल्लेख करण्यात आलेला होता.तद्नंतर शासनाने कर्ज फेडीचा कालावधी दिनांक 31/07/2017 पर्यन्त वाढविण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात महाऑनलाईन केंद्र, सी. एस. सी .केंद्र आणि ए. एस. एस. के. केंद्रावर दिनांक 22/09/2017 या वाढीव मुदती पुर्वी 3 लाख 65 हजार 327 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्जाची नोंदणी केलेली आहे. या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी 180940 शेतकऱ्यांनी कर्ज माफीसाठी ऑनलाईन अर्जाचा भरणा केला आहे. शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या ऑनलाईन अर्जाचे परभणी जिल्ह्यामध्ये दिनांक 1 व 2 ऑक्टोंबर, 2017 रोजी एकुण 644 गावामध्ये चावडी वाचन पुर्ण् करुन दि. 05/10/2017 पर्यत आलेल्या आक्षेप अर्जावर संबंधित सदस्य सचिव तालुकास्तरीय अमंलबजावणी समिती तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी निर्णय घेवुन पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे. योजनेच्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती प्रारंभ व पात्र शेतकऱ्यांचा कुटुंबासह प्रातिनिधिक सत्कार सोहळा 18/10/2017 रोजी परभणी येथे पार पडला .
या योजनेच्या अनुषंगाने शासनाकडुन मध्यवर्ती बॅक, व्यापारी बॅका, राष्ट्रीयकृत बॅका व ग्रामिण बॅका यांना दिनांक 08/11/2017, 27/11/2017,28/11/2017 व 06/12/2017 रोजी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या ग्रीन लिस्ट याद्या प्राप्त झालेल्या आहेत. सदर याद्यांमधील परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक म.परभणी यांनी थकबाकीदार, प्रोत्साहनपर, पुर्नगठण व ओ.टी.एस. यांच्या लाभास पात्र असलेल्या 31878 शेतकऱ्यांची एकुण रुपये 42.23 कोटी संबंधित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बॅका पैकी स्टेट बॅक ऑफ इंडिया बॅकेने 10758 शेतकऱ्यांची एकुण रुपये 73.38 कोटी, बॅक ऑफ महाराष्ट्र यांनी 4273 शेतकऱ्यांची एकुण रुपये 27.97 कोटी,सेट्रल बॅक ऑफ इंडिया यांनी 316 शेतकऱ्यांची एकुण रुपये 2.18 कोटी,युनियन बॅक यांनी 327 शेतकऱ्यांची एकुण रुपये 2.43 कोटी, बॅक ऑफ बडोदा यांनी 381 शेतकऱ्यांची एकुण रुपये 3.18 कोटी, आंध्रा बॅक यांनी 62 शेतकऱ्यांची एकुण रुपये 0.29 कोटी, अलाहाबाद बॅक यांनी 2005 शेतकऱ्यांची एकुण रुपये 14.27 कोटी, कॅनरा बॅक यांनी 674 शेतकऱ्यांची एकुण रुपये 4.58 कोटी, दैना बॅक यांनी 176 शेतकऱ्यांची एकुण रुपये 1.25 कोटी, इंडियन ओव्हरसिस बॅक यांनी 99 शेतकऱ्यांची एकुण रुपये 0.68 कोटी, सिंडीकेट बॅक यांनी 214 शेतकऱ्यांची एकुण रुपये 1.51 कोटी, युको बॅक यांनी 1380 शेतकऱ्यांची एकुण रुपये 6.37 कोटी, विजया बॅक यांनी 193 शेतकऱ्यांची एकुण रुपये 1.50 कोटी एवढ्या रक्कमा संबंधित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग करण्यात आल्या आहेत.तसेच महाराष्ट्र ग्रामिण बॅक यांनी 14136 शेतकऱ्यांची एकुण रुपये 89.09 कोटी एवढी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे.
अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत परभणी जिल्ह्यात मध्यवर्ती बॅक, व्यापारी बॅका, राष्ट्रीयकृत बॅका व ग्रामिण बॅका यांच्या एकुण 53883 शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावर रुपये 258.58 कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, परभणी, जिल्हा अग्रणी बॅक अधिकारी, परभणी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक म.परभणी यांचे समन्वयाचे माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे कामकाज युध्दपातळीवर परभणी जिल्ह्यात चालु आहे. शेवटच्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी होईपर्यंत ही योजना राबविली जाईल अशी घोषणा नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यानूसार कर्जमाफीची प्रक्रीया सुरु आहे असेही ते म्हणाले.

जाहिरात