संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यमंत्री मदन येरावार यांना दिले निवेदन ! – संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची केली मागणी

0
760
Google search engine
Google search engine

जागतिक संत्रा महोत्सव बैठकीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या !

रुपेश वाळके – दापोरी –

अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे जागतिक संत्रा महोत्सवा निमित्य विभागीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी राज्यमंत्री मा ना मदन येरावार (राज्यमंत्री पर्यटन , सामान्य प्रशासन , सार्वजनिक बांधकाम ) यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली . या बैठकीमध्ये जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांनी आपल्या समस्या उपस्थित केल्या यावेळी संत्रा उत्पादक शेतकरी राजेश्वर ठाकरे , संत्रा उत्पादक संघाचे रमेश जिचकार , संत्रा उत्पादक शेतकरी धनंजय तोटे , बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके यांनी राज्यमंत्री मा ना मदन येरावार यांची भेट घेऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या सोबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.

विदर्भातील मुख्य फळपीक संत्रा असून विदर्भामध्ये सव्वा लाख हेक्टर वर संत्राची लागवड झालेली आहे , संत्रा पिकावर अवलंबून असणारे सुमारे सव्वा लाख कुटुंब असून त्यांचा उदरनिर्वाह सामाजिक व आर्थिक परिस्तिथी संत्रा पिकावर अवलंबून आहे . परंतु मागील आठ ते दहा वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे . त्यातून बाहेर पडण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आले .

संत्राची उत्पादकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाची वृद्धी करण्यात यावी . दर्जेदार संत्रा उत्पन्न करण्यासाठी संत्राचा सुधारित जाती निर्माण करण्यात याव्या , संत्रा निर्यातीकरिता आवश्यक त्या सोई सुविधा निर्माण करण्यात याव्या , बांगलादेशमध्ये सर्वात जास्त नागपुरी संत्रा निर्यात होतो त्याकरिता पणन महामंडळाचे कार्यालय बांगलादेशमध्ये सुरू करावे , सार्क देशामध्ये संत्रा निर्यातीकरिता प्रयत्न करावे , संत्रा ज्यूस प्रक्रिया कारखाने निर्माण करण्यात यावे , एन आर सी सी नागपूर येथे संत्राची आदर्श संत्रा बाग निर्माण करावी त्यापासून शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल मात्र तिथे शेतकऱ्यांना कोणत्याच प्रकारचे सहकार्य मिळत नसून चांगल्या प्रकारच्या जातिवंत संत्रा कलमा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात याव्या .

एन आर सी सी तर्फे जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात यावे . नागपुरी संत्रा फळाचा आकर्षक रंग , आंबट गोड चव , भरपूर अ ब क जीवनसत्वे , पोषक फळे , उत्साहवर्धक स्वादिष्ट , व आरोग्यदाइ आहे संत्राचा खप वाढविण्याच्या दृष्टीने संत्राचे आहारातील महत्व व पोषण मूल्य जनतेसमोर आणणे गरजेचे आहे यासाठी देशातील मोठ्या ते मध्यम शहरात संत्रा महोत्सत आयोजित करून उत्पादक ते ग्राहक संत्रा विक्री करून जनजागृती करणे , प्रदर्शन , चर्चासत्र , माहिती फलक , इत्यादी बाबींसाठी जाहिरात व उपभोक्ता जनजागृती अभियान राबवने गरजेचे आहे . दूरदर्शन व आकाशवाणी द्वारे संत्राची जाहिरात करावी , तसेच संत्राचा खप वाढविण्यासाठी संत्रा ज्यूस चा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा , सर्व शासकीय बैठकांमध्ये संत्रा ज्यूस पुरविणे अनिवार्य करावे , एस टी स्टँड व रेल्वे स्टेशनला संत्रा विक्रीसाठी , संत्रा ज्यूस पार्लरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन राज्यमंत्री मा. ना. मदनजी येरावार , यांना निवेदन देऊन संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी चर्चा करण्यात आली त्यावेळी निवेदन देतांना संत्रा उत्पादक शेतकरी राजेश्वर ठाकरे , संत्रा उत्पादक संघाचे रमेश भाऊ जिचकार, संत्रा उत्पादक शेतकरी धनंजय तोटे , बळीराजा संत्रा उत्पादक संघाचे अध्यक्ष रुपेश वाळके , मा श्रीधरराव ठाकरे , , रवींद्र पाटिल, अतकरे साहेब. निलेश राजस , यांच्यासह शेकडो संत्रा उत्पादक शेतकरी यावेळी उपस्थित होते.