अवैध रेती तस्कर याच्यावर तहसीलदार शिल्पा बोबडे याचा शीकंजा – एकाच वेळेस लसनापूर येथे पकडले 3 ट्रॅक्टर

0
664
Google search engine
Google search engine

बादल डकरे / चांदुर बाजार –

चांदुर बाजार येथील तहसीलदार शिल्पा बोबडे याच्या मार्गदर्शन खाली काल दिनांक 12 डिसेंबर 2017 ला अवैध रेती ची वाहतूक करताना तीन ट्रॅक्टर पकडले.तहसीलदार याच्या कार्यवाही अवैध रेतीची वाहतूक करणारे याना धास्ती बसली आहे.

काल दिनांक 12 डिसेंबर ला राजना पूर्णा वरून लसनापूर येथे अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा बोबडे याना मिळताच क्षणी त्यांनी आपली टीम पाठविली असता त्यांना अ. रजाक अ. सतार रा.धानोरा पूर्णा ट्रकर मालक असून याचा वाहक दिलीप नादाने त्याचा ट्रकर क्रमांक MH 27 L 9829,
अ. राजीक अ.रौफ रा.सुदरपुर ता चांदूर बाजार हा ट्रॅक्टर मालक असून त्याचा वाहक नंदू पारिसे, ट्रॅक्टर MH27 BB-2672,
रिजवान अ. अब्दुल नसीर रा.घातलाडकी वाहक रिजवान अ. अब्दुल नसीर याचा ट्रॅक्टर क्रमांक नाही असे तीन ट्रॅक्टर महसून विभागाद्वारे तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले आहे.
ही कार्यवाही तहसीलदार चांदुर बाजार याच्या मार्गदर्शन खाली श्री.आर.आर.ठाकरे यांचे टीम ने केली अशी माहिती तहसील कनिष्ठ लिपिक निलेश फुटाणे यांनी माहिती दिली.