वरवट बकाल बसस्थानकावर लोकवर्गनीतुन होणार शौचालय बाधकांम.

0
720
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण –

बुलडाणा जिल्हातील संग्रामपुर तालुक्यातील मध्यभागी असलेल्या वरवट बकाल बसस्थानकावर लोकसहभागातुन शौचालय व मुतारी बांधण्याबाबतची बैठक संपन्न्‍ा झाली . वरवट बकाल बसस्थानकांवर नेहमी प्रवाशी वर्गाची वर्दळ असते व मध्यभागी असलेल्या या बसस्थानकांवर महिला व पुरुष प्रवाशी वर्गासाठी शौचालय व मुतारी नसल्यामुळे महिला व पुरुषांसाठी सुलभ शौचालय व मुतारी बांधकामासाठी लोकवर्गणी करण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. यावेळी सामाजीक कार्यकर्ता अभयसिह मारोडे यांनी 5 हजार रुपये रोख नियोजन समितीला सुपुर्थ केले . 2 लाख रुपये खर्चाचे सुलभ शौचालय व मुतारी बांधकाम ह्या बस स्थानकावर आगामी काही दिवसात सुरु होणार असल्याची माहिती या नियोजन समितींनी यावेळी बोलतांना सांगितले. तसेच पहिल्या दिवशी अभयसिंह मारोडे ह्यांनी पाच हजार रुपये देणगी देवून निधी संकलनाला सुरुवात झाली आहे या बैठकीत दरम्यान महीला व पुरुषांसाठी सुलभ सौचालय व मुतारी बांधकामा साठी लोकवर्गनी करण्यासाठी या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला माजी सभापती गजानन ढगे , सामाजिक कार्यकर्ते अभयसिंह मारोडे , भैयाभाऊ बकाल ,पत्रकार संघाचे अध्यक्ष केशवराव घाटे ,जेष्ठ पत्रकार भाऊ भोजने ,प्रल्हाद दातार ,शेख अनिस,संतोष देवूकार ,सामाजिक कार्यकर्ते गोपाल इंगळे ,नारायण सावतकर,मकसुद अली आदी उपस्थित होते .