अमरावती येथे हिंदुत्वनिष्ठांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न -राणी पद्मावतीला नाचतांना दाखवलेले घुमर गाणे चित्रपटातून वगळा

0
1463

अमरावती – येथे हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांनी  राजकमल  चौक, अमरावती येथे काल  दिनांक १३ डिसेंबर ला राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत धरणे आंदोलन आयोजित केले होते . आंदोलनात विशेष करून पद्मावती चित्रपटला विरोध करण्यात आला राणी पद्मावतीला नाचताना दाखवलेले घुमर गाणे चित्रपटातून वगळावे आणि हिंदुत्ववादी संघटनांचा शिष्टमंडळाला हा चित्रपट दाखून त्याचे शंका निरसन करूनच चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी हि करण्यात आली तसेच काश्मीर खोऱ्यात दहशतवादी बुरहान वाणीला लष्कराने ठार केल्यानंतर हिसंक आंदोलनांनी हिसक रूप घेतले. भारतीय जवानांवर दगडफेक करणे, भारताचा राष्ट्रध्वज जाळणे, भारतविरोधी घोषणा देणे आदी अनेक देशविरोधी कृत्ये करणायत आली या काळात झालेल्या हिंसाचारात सुरक्षा दलाचे ४५१५ जवान तर ३३५६ सामान्य नागरिक जखमी झाल्याची माहिती खुद्द गृह मंत्री यांनी दिली याच बाबतीत ४५०० हून अधिक युवकांवरील गुन्हे मागे घेण्याची शिफारस  केल्या गेली आहे. जम्मूकाश्मीर चा मुख्यमंत्री यांनीही गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे.याचा हि विरोध यावेळी करण्यात आला.

 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांचा मूर्तीवर विलेपन करून ती रासायनिक व अधार्मिक न होऊ देण्यासाठी विठ्ठल मूर्तीचा रक्षणासाठी हि यावेळी मागणी करण्यात आली. श्री विठ्ठल यांचा मूर्तीवर धर्मशास्त्रात न सांगितलेले रासायनिक लेपण करणे , हे धर्मशास्त्रीयदृष्ट्या सर्वथा अयोग्य आहे. याबात  हि आंदोलनात विरोध दर्शवण्यात आला.

 

 

वायुप्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर केवळ दिवाळीतच नाही तर नाताळ आणि ३१ डिसेंबर च्या काळातही बंदी घालण्यात यावी अशी हि मागणी हिंदुत्ववादी संघटनाकडून करण्यात आली महाराष्ट्र सरकारने शाळेमधील विद्यार्थ्यांकडून शपथग्रहण कार्यक्रम घेतले होते  या विषयी अनेक स्तुत्य उपक्रम राबवले  येत्या 25 डिसेम्बर पासून टे १ जानेवारी पर्यंत ख्रिस्ती नववर्षाचा निमित्ताने मोठ्या प्रमाणात फटके फोडल्या जातात याबाबत हि विरोध दर्शवण्यात आला.

यावेळी  श्री नितीनजी व्यास – हिंदू महासभा  , श्री मानव बुद्धदेव-श्री योग वेदांत सेवा समिती, श्री निलेश टवलारे- हिंदू जनजागृती समिती , सौ विभा चौधरी -सनातन संस्था,  व इतर हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते

 

क्षणचित्रे

  • या वेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली व स्वाक्षरी केलेलं मागण्यांच निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार