25 डिसेंबरला स्व. डॉ. पांडुरंग ढोले स्मृती प्रित्यर्थ रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा – संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधुन आयोजन

0
756
Google search engine
Google search engine
चांदुर रेल्वे – (शहेजाद खान ) 
संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधुन माजी आमदार स्व. डॉ. पांडुरंगजी ढोले यांच्या स्मृती प्रित्यर्थ रूग्णवाहिका तयार करण्यात आली असुन या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा 25 डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.
        स्थानिक सर्व शाखीय तैलिक समाज संघटनेच्या वतीने समाजातील नागरिकांसाठी सतत अनेक लोकोपयोगी कार्य करतात.  यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजातील मागास घटकांची प्रगती कशी होईल यासाठी प्रयत्न आणि इतर विविध उपक्रम तसेच दरवर्षी संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवासोबतच समाजातील विशिष्ट मान्यवरांचा सत्कार सुद्धा करण्यात येतो. यावर्षी सुद्धा 25 डिसेंबरला सर्व शाखीय तैलीक समाज संघटनेच्यावतीने संत जगनाडे महाराज पुण्यतिथी महोत्सवासोबतच मान्यवरांचा सत्कार  येणार आहे. तसेच यावर्षी माजी आमदार स्वर्गीय डॉ. पांडुरंगजी ढोले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गोरगरीब गरजू रुग्णांसाठी ढोले परिवारातर्फे रुग्णवाहिका घेण्यात आली व या रुग्णवाहिकेचा या कार्यक्रमात लोकार्पण सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. याव्यतीरीक्त खगोल अभ्यासक विजय गिरूळकर व नवनिर्वाचित मांजरखेड कसबा येथील सरपंच दिलीप गुल्हाने यांचा सत्कार सुद्धा यावेळी करण्यात येणार आहे.
       25 डिसेंबर रोजी सर्वप्रथम प्रभुजी मदनकर महाराज, शिराळा यांच्या हस्ते काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामदास तडस राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस रामदास आंबटकर, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी खासदार सुरेश वाघमारे ,यवतमाळ माजी जि.प. सदस्य संध्याताई सव्वालाखे, माजी जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, तैलिक समितीचे अध्यक्ष मधुकर सव्वालाखे, जि.प. सदस्य सुरेश निमकर, मुंदडा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत कारमोरे, देवराव पाटील प्रमोद दंडवे, डॉ. क्रांतीसागर ढोले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. कार्यक्रम 25 डिसेंबरला सकाळी 9 वाजतापासून सुरू होणार असून महाप्रसाद दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत राहणार आहे. तरी सर्व समाज बंधूंनी संताबाई यादव सभागृह, वकील लाईन चांदुर रेल्वे येथे उपस्थित राहावे अशी विनंती उत्सव समितीच्यावतीने करण्यात आली आहे.