*भानखेडच्या वृद्ध मंडळींनी अनुभवला पर्यावरण पूरक विवाह सोहळा- निसर्गरम्य वातावरणात पाना-फुलांच्या साक्षीने पार पडला आदर्श विवाह*

0
781
Google search engine
Google search engine

तरटे-पेटकर कुटुंबीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

तालुका प्रतिनिधी -भातकुली / गजानन खोपे

आजच्या युगात लाखो रुपये खर्चून प्रतिष्टा जपण्यासाठी लग्न सोहळा साजरा होतांनाची प्रथा समाजात सर्वत्र दिसून येत असली तरी अमरावतीच्या एका हौशी वन्यजीव अभ्यासकाने निसर्गरम्य वातावरणात पाना-फुलांच्या साक्षीने आदर्श विवाह केला आहे. एवढंच नव्हे तर आयुष्याची सत्तरी गाठलेल्या वृद्ध मंडळींनी हा पर्यावरण पूरक विवाह सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.

आजच्या पिढीसमोर आदर्श निर्माण केलाय तो यादव तरटे पाटील यांनी. लग्न म्हटलं की तो एक प्रकारचा सोहळाच असतो आणि या सोहळ्यात वर पक्ष असो किंवा वधू पक्ष प्रत्येक जण आपापल्या परीने खर्च करायला तयार असतो. कधीकधी तर ऐपतीच्या बाहेर खर्च या लग्न समारंभात होत असतो. कधी समाजात स्वतःचा मान वाढविण्यासाठी तर कधी वरपक्षाच्या दबावाखाली येऊन अमाप पैश्याची उधळण होत असते. पण काय खरच लग्नासाठी एवढा पैसा खर्च करणे आवश्यक असते…? काय तोच पैसा एखाद्या गरजूच्या उपयोगात नाही आणल्या जाऊ शकत…? याच सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा एक अलिशान नाही तर पर्यावरण पूरक आदर्श विवाह सोहळा मंगळवारी अमरावतीपासून काही अंतरावर असलेल्या मातोश्री वृद्धाश्रमात पार पडला.

सध्या अमरावती जिल्ह्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्त सर्वत्र लग्न कार्यालयात पोहचण्यासाठी चारचाकीच्या युगात पारंपारीकतेला देखील महत्व आले आहे. वऱ्हाडी मंडळींना लग्न कार्यालयात पोहोचविण्यासाठी गाड्याच्या गाड्या डझनाने बुकिंग केल्या जात आहेत. अशी स्थिती असताना सामाजिक बांधिलकी जोपासत पर्यावरणाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील आणि अनुश्री यशवंत पेटकर या दोघांनी संसार फुलविण्याचा विचार घेतला. कोणतेही प्रदूषण न होता लग्नसोहळाही पर्यावरण पूरक व्हावा याची काळजी घेण्यात आली होती. भानखेडच्या मातोश्री वृद्धाश्रमात वडाच्या झाडाचे रोपण करून वृक्षपूजन केले. यादव यांनी बी. कॉम, ह्युमन राईट डिप्लोमा, एम. एस. डब्ल्यू पर्यंत शिक्षण घेतले असून सध्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनवर्सन विषयावर पी. एच. डी. करत आहे. तर अनुश्री हिने डी. एड. केमेस्ट्री विषयात एम.एस. सी. पूर्ण करून तर सध्या इन्व्हार्नमेंट विषयात पुन्हा एम.एस. सी. करत आहे. वृद्धश्रमातील वृद्ध मंडळींनी सुद्धा प्रथमच पर्यावरण पूरक विवाह सोहळा अनुभवला. आजच्या युगात खर्चाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासून तरुण पिढीने आदर्श विवाह हि संकल्पना अमलात आणली पाहिजे. तरटे-पेटकर कुटुंबीयांनी पर्यावरण पूरक विवाह सोहळा आयोजित करून समाजापुढे आदर्श निर्माण केलाय ताशीव भावना, यावेळी विभागीय महसूल उपआयुक्त गजेंद्र बावणे, डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, डेप्युटी इंजिनिअर सचिन चौधरी, वृद्धाश्रमचे सर्वेसर्वा राऊत आजोबा मानद वन्यजीव रक्षक डॉ. श्री जयंत वडतकर यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणचे सहायक महानिरीक्षक हेमंत कामडी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. श्री नितीन व्यवहारे, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, विभागीय वन अधिकारी विशाल माळी, प्रमोद पंचभाई, सैफ शेख, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, मानद वन्यजीव रक्षक प्रा. सावन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर अतिथी उपस्थित होते.