राष्ट्रसंताचे विचार प्रत्यकाने अंगिकारावे – डॉ सतिश वारजुकर

0
831
Google search engine
Google search engine

शंकरपुर / महेश कोडापे –

राष्ट्रसंतानी जीवनात प्रत्यकाने कसे वागावे याचे धड़े ग्रामगीतेतुन दिले आहे त्यानी सांगितलेले विचार प्रत्यकाने अंगिकारल्यास मानव जीवन सुखी होईल पन चिमूर विधान सभेत राष्ट्रसंताचा नावाचा वापर राजकारनासाठी केला जातो ही खेदाची बाब आहे या गावाच्या विकासासाठी कधी कमी पडलो नाही आणि समोरहि पडणार नाही असे प्रतिपादन डॉ सतीश वारजुकर यानी केले ते श्री .विठ्ठल रुख्मीनी देवस्थान मंडळ ,
श्री .गुरुदेव सेवा मंडळ तथा सर्व ग्रामवासीय बोडधा यांच्या वतीने वंदनीय .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 49 वा पुण्यतिथी महोत्सवा निमीत्य बोलत होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून तांदुड़ गिरनी चे माज़ी अद्यक्ष किशोरबापू शिंगरे प से सदस्य तथा गटनेते
रोशनभाऊ ढोक प स सदस्य भावना बावनकर सरपंच
चरणदासजी वाघ बोडधा सरपंच कल्पना उइके पिम्पलगाव सरपंच सरिता वाटघूरे आदि मान्यवर मंडडी उपस्थित होती कार्यक्रमाला गुरुदेव भक्त गावकरी मंडळी उपस्थित होते

याच कार्यक्रमात गावातील व्यसन सोडणाऱ्या सात युवकाचा सतिष वारजुकर यांच्या हस्ते दुपट्टा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला