एकात्म मानवदर्शन हे विश्‍वबंधुत्वाच्या चिंतनाचा आधार असेल – स्वामी गोविंददेव गिरी

0
767
Google search engine
Google search engine

पंडित दीनदयाळ उपाध्याय वाड्मय प्रकाशित

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन हेच विश्व बंधुत्वभावाच्या चिंतनाचा आधार असेल असे मत स्वामी गोविंददेव गिरी यांनी  असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या 15 वाड्मय खंडाच्या प्रकाशन सोहळा हेमा फाउंडेशनच्या वतीने मुंबईत बिर्ला मातोश्री येथे आयोजित करण्यात आला होते  त्यावेळी त्यांनी केले.

यावेळी स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले की, साधेपणात असामान्य व्यक्तीमत्वाचा आदर्श म्हणजे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे चरित्र आहे. पंडित उपाध्याय यांच्या काळापेक्षा आजचा काळ पूर्णपणे वेगळा आहे. आज देशाची स्थिती संपूर्णपणे पालटली आहे आणि केंद्रासह विविध राज्यात पंडित उपाध्याय यांच्या विचारांवर चालणारी सरकारे सत्तारुढ आहेत. आज संपूर्ण देशच नव्हे तर विश्‍वदेखील पंडित उपाध्याय यांचे वाङमय वाचण्यासाठी आसुसलेले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे वाङमय हे एका ऋषी, संत, मुनीचे आहे. पंडित उपाध्याय हे एकमेव राजकीय क्षेत्रातील महापुरुष आहेत, ज्यांनी जनतेला एकात्म मानवदर्शनासारखे तत्त्वज्ञान दिले. अन्य कोणत्याही राजकीय क्षेत्रातील व्यक्तीने असे कार्य केले नाही. शिवाय पंडित उपाध्याय यांच्या वाङमयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे विचार कोणत्याही भेसळीविना जसेच्या तसे उतरलेले दिसतात, असे स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले. तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेले एकात्म मानवदर्शन हे काही केवळ हिंदुंसाठी, भारतीय जनता पक्षासाठी किंवा भारतासाठीच नाही तर संपूर्ण विश्‍वासाठी आहे. एकात्म मानवदर्शन दिल्यामुळे संपूर्ण विश्‍व आगामी काळात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे ऋणी राहिल्याशिवाय राहणार नाही. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी राजकारणात आल्यानंतर मी केवळ संस्कृतीचा दूत म्हणून असल्याचे म्हटले होते आणि त्यांचा उद्देश देशाची चिती जागृती करण्याचा होता, असे ते म्हणाले. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्वातंत्र्यानतर साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ठेवणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन होते. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या आधारे आपले विचार आणि तत्त्वज्ञान जनतेसमोर मांडले. देशातील अंतिम व्यक्तीसाठी, त्याच्या विकासासाठी शासनव्यवस्थेने कशाप्रकारे विचार केला पाहिजे, हे त्यांनी त्यांच्या वाङमयातून दाखवून दिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वे अन्य देशांकडून काही ना काही उसने घेण्याची वृत्ती ठेऊन असताना पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी भारतीय विचारांच्या आधारे आपले चिंतन केले, हे खरोखर विलक्षण होते, असेही त्या म्हणाल्या. आज दीनदयाळजींच्या संपूर्ण वाङमयाच्या 15 खंडाचे लोकार्पण केले जात आहे, पण त्यांच्या या वाङमयाचा छोट्या छोट्या पुस्तकाच्या रुपातून अधिकाधिक प्रसार-प्राचार व्हावा, अशी अपेक्षाही यावेळी मृदुला सिन्हा यांनी व्यक्त केली. आर्थिक स्थितीवर विचार करण्यासाठी जग जेव्हा बैठकीला बसेल त्यावेळी त्यांना एकात्म मानवदर्शनाला आपलेसे करावेच लागेल. एकात्म मानवदर्शनाचा आधार घ्यावाच लागेल. आणि याच सिद्धांताच्या आधारावर भारत पुन्हा एकदा विश्‍वगुरु होऊ शकतो. असे सिन्हा म्हणाल्या. राम रत्न ग्रुपचे हेमा फाउंडेशन मुलांच्या कल्याणकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभर कार्यरत आहे. 19 राज्यात 45 हजार शाळेत हेमा फाउंडेशन मुलांच्या कल्याणकारी योजना राबवत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुलांसाठीही मोठे कार्य केले होते. त्या कार्याची परंपरा हेमा फाउंडेशन सुरु ठेवत आहे, असे सांगत राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी हेमा फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. असेच कार्य पुढे सुरु राहील व मुलांचा सर्वांगीण विकास होईल, अशी आशा राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, एकात्म मानवदर्शन अनुसंधान व विकास प्रतिष्ठानचे मेहश शर्मा, हेमा फाउंडेशनचे मुख्य विश्वस्त महेंद्र काबरा, विश्वस्त अनिता माहेश्वरी, रामेश्वरलाल काबरा, बिमल केडिया, आमदार राज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.