संग्रामपुर तालुक्यात बोंडअळीग्रस्त कपाशी पिकाची पाहणी सुरू

0
760
Google search engine
Google search engine

-दयालसिंग चव्हाण/संग्रामपुर –

बुलढाणा :- संग्रामपुर तालुक्यातील परिसरात बोंडअळी नुकसानीची पाहणी सुरू झाली असून आज दि.14 डिसेंबर रोजी आवार येथे तलाठी,ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत शेतात जाऊन बोंडअळीचे नुकसान झालेल्या कपाशी पिकाची पाहणी करण्यात आली.

कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतक-यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे़ कापूस पिकाच्या नुकसानीबाबत आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतक-यांमधून केली जात होती़.

त्यानुसार शासनाने कापूस उत्पादक शेतक-यांकडून प्रस्ताव मागवून घेण्यात आले होते़ यावेळी शेतक-यांना कापसाची लागवड, पीक पेरा आणि बियाणे खरेदीच्या पावत्यांसह जी फॉर्म भरून प्रस्ताव दाखल केले आहे. त्यानुसार कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या पथकामार्फत हे सर्वेक्षण केले जाणार आहे़ सर्वेक्षण करताना नुकसानग्रस्त शेतीची जीपीएस इनेबल फोटो काढण्याच्या सूचनाही देण्यात आले आहेत.
कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव व धान्य पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत़ या संदर्भात संग्रामपुर तहसील कार्यालयात तालुक्यातील कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक यांची बैठक घेण्यात आली़ या बैठकीत बोंडअळीच्या नुकसानीचे संयुक्त सर्वेक्षण करण्याबाबत सूचना देण्यात आले़ याबाबत तहसीलदारांनी आदेश निर्गमित केले असून संग्रामपुर तालुक्यात बोंडअळीच्या नुकसानीचेे सर्वेक्षण सुरू झालेले आहे .त्यानुसार संग्रामपुर तालुक्यातील आवार येथे आज दि.14 डिसेंबर रोजी तलाठी कुसळकर,ग्रामसेवक यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी कृषि सहाय्यक,पोलिस पाटील,यांच्यासह शेतकरी एकनाथ दुतोंडे,निलेश अवचार,देविदास हागे आदी शेतकरी उपस्थित होते.