अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन होणार लवकर जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर यांचा प्रयत्ननाला मिळणार यश

0
481
Google search engine
Google search engine

चिमूर / महेश कोडापे –

चिमूर पंचायत समिती अंतर्गत बाल विकास प्रकल्प मार्फत च्या अंगणवाडी सेविका व मदतनीस चे वेतन मिळाले नव्हते तेव्हा दिवाळी अधारात गेली जिप गट नेते डॉ सतीश वारजूकर यांनी शासन व प्रशासन स्तरावर जोरदार प्रयत्न करून प्रशासन ला यंत्रणेला हलविले आणि आता लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात उर्वरित कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळणार असल्याची माहिती पस गट नेते रोशन ढोक यांनी दिली
तालुक्यातील एकूण अंगणवाडी कर्मचारी ५२२चे ऑन लाईन नोंदणी झाली असून भारत रत्न डॉ अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे ५ कोटी, २० लाख ०२ हजार ०५० रुपये ,अंगणवाडी सेविका व मदतनीस चे जून ते ऑक्टो २०१७ पर्यतचे नियमित व वाढीव वेतन ५२ लाख, ३२हजार ९७० रुपये तसेच भाऊबीज योजने चे मानधन ५ लाख ४६ हजार रुपये मजूर झाले असून लवकरच डी डी च्या स्वरूपात जमा होणार आहे
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मदत्तीसाठी जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर यांनी प्रयत्न करून संबंधित प्रशासन यंत्रने ला धारेवर धरून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले येत्या एक दोन दिवसात अगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती पस गट नेते रोशन ढोक यांनी सांगितली असून जी प गट नेते डॉ सतीश वारजूकर यांच्या प्रयत्ना ला यश आल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले