उर्दु शाळेतील ई-लर्निंग संचाचे उद्घाटन

0
500
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि-समीर देशमुख

शेगाव- न.प.च्या शाळेकडून शैक्षणिक स्तरावरचे कोणतेही प्रस्ताव आल्यास त्याकरीता निधी कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन नगर परिषदेतील सत्ताधारी भाजपाचे गटनेते शरद अग्रवाल यांनी एका कार्यक्रमप्रंसगी केले. ते नगर परिषदेच्या शहीद-ए-वतन टिपू सुलतान उर्दु उच्च प्राथमिक शाळेतील डिजीटल वर्गांचे उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
नगर परिषदेच्या शहीद-ए-वतन टिपू सुलतान या उर्दु शाळेतील डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन आज सकाळी 11 वा.सुमारास मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.शकुंतलाबाई बुच ह्या होत्या. तर प्रमुख उपस्थितीमध्ये उपाध्यक्षा सौ.वर्षा ढमाळ, शिक्षण सभापती सौ.सुषमा शेगोकार, गटनेते शरद अग्रवाल, मुख्याधिकारी अतुल पंत यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
या शाळेचे मुख्याध्यापक मो.साबीर यांनी त्यांचे सहकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सै.इम्रान आणि समितीच्या सदस्यांच्या सहकार्याने चार वर्ग डिजीटल बनविण्यात आले असून याकरीता 1 लाख 13 हजार रूपये खर्च करण्यात आले आहेत. यावेळी बोलतांना मुख्याधिकारी पंत म्हणाले की, ही शाळा शहरातील उर्दु शाळेमधून आदर्श झाली असून मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी हा मैलाचा दगड पार केला आहे. ज्यामूळे विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगात आपली प्रगती साधता येणे शक्य होणार आहे. या कार्यक्रमप्रसंगी माजी नगरसेवक अन्सार सिध्दीकी, अविनाश दळवी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सै.इम्रान यांची समायोचित मार्गरदर्शन झाले. शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टीकोनातून सर्व सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामूळे शाळेचे नावासह विद्यार्थी या डिजीटल युगात स्पर्धेत कायम रा कार्यक्रमाला प्रभागाचे नगरसेवक शे.नईम, वसीम पटेल, नगरसेविका सौ.ज्योती चांडक, नगरसेवक विजयबाप्पू देशमूख, भाजपा नेते पांडुरंग बुच, माजी नगरसेवक अविनाश दळवी, अन्सार सिध्दीकी, बुढन जमदार, नितीन शेगोकार, कमलाकर चव्हाण, अशोक चांडक, मो.सादिक, आबीद शाह, शे.चांद, प्रशासन अधिकारी के.एल.जावळे, आर.पी.इंगळे आणि पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.