हेतू परस्पर होत नाही आहे श्री दिपक निचत याच्या घराजवळील नाली. – सरपंच सचिव यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

0
711
Google search engine
Google search engine

सरपंच पती करीत आहे ग्रामपंचायत च्या कामात ढवळाढवळ

चांदुर बाजार:—-प्रतिनिधी

नेहमी कोणत्या तरी कारणावरून चर्चा करण्याचा विषय ठरत असलेले काजळी येथील ग्राम पंचायत मधील धक्का दायक प्रकार समोर आला आहे.या ठिकाणी महिला सरपंच आहे मात्र ग्राम पंचायत च्या कामात त्यांचे पती हे दखल देत असल्याने अनेक विकास कामे कोळबल्याचा आरोप वार्ड क्रमांक 3 मधील रहिवाशी दिपक निचत यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती चांदुर बाजार यांच्याकडे केलेल्या तक्रारी मध्ये केला आहे.

दीपक निचत याच्या घरासमोरील सांडपाणी आणि पथ दिव्याची सोय करण्याकरिता निचत आणि दिनांक 23 ऑगस्ट 2017 ला अर्ज केला होता.मात्र त्यांच्या अर्जावर कोणत्याच प्रकारची चौकशी किंवा कार्यवाही झाली नाही.म्हणून त्यांनी दिनांक 15 डिसेंबर 2017ला ग्राम पंचायत कार्यलय या ठिकाणी अर्ज केला.मात्र हे काम नालीचे बांधकाम हेतू परस्पर होत नसल्याने त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दिनांक 16 डिसेंबर 2017 ला गटविकास अधिकारी चांदुर बाजार याच्या कडे आपली तक्रार केली.यामध्ये सरपंच आणि सचिव हे याकडे मुद्धाम लक्ष देत नाही आणि गावातील कोणत्याही कामात सरपंच पती हे डोके घालत असल्याने गावचा विकास खुंटला जात आहे.असे यांनी आपल्या तक्रारी मध्ये म्हटले आहे.या गावचे सचिव मुख्यालयीन राहत नसल्याने गावामध्ये 14 वित्त आयोग निधी कोठे वापरला जात आहे याची माहिती पण जनतेला नाही.निचत याच्या तक्रारी मुळे गावातील अनेक रहस्यमय प्रकरण हे उजेडात येणार आहे.मात्र 14 वित्त आयोग निधीचा उपयोग फक्त हेतू परस्पर च होत आहे का?आपण तुपाशी जनता अस्वच्छते जवळ. असे या गावचे एकंदरीत चित्र तयार झाले आहे.या गावामध्ये सरपंच पती याच्या हस्तक्षेप मुळे फक्त राजकीय संबंध ओळखूनच कामे होत असल्याचे निचत यांनी माध्यमांना सांगितले.आता गटविकास अधिकारी विशाल शिंदे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रचलित आहे. ते या प्रकरणाकडे किती दक्ष राहतील ,हे पाहवेच लागेल.निचत याची तक्रारी मुळे त्यांनी अनेक प्रकारचे भय सुद्धा दाखविण्यात आले. असल्याचे स्पस्ट झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. जो गावच्या विकासासाठी आवाज उठवितो त्याचा आवाज वर न येऊ देण्याचे काम कोण करीत आहे?याची चौकशी होणे आणि दोषींवर कार्यवाही होणार की नाही हे पाहावेच लागेल.