झोन 4 चे एसीपी निलेश मोरे यांची बदली ; पत्रकार मारहाण प्रकरण – पत्रकार संरक्षण समिती  ने ही दिले होते निवेदन

0
831
Google search engine
Google search engine

पुणे :- माजंरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ज्ञानेश भुकेले यांना झोन 4 वानवडी चे एसीपी निलेश मोरे यांच्या कडून मारहाण झाली होती त्याचे पडसाद दोन दिवसा पासून पुणे शहर मध्ये उमटत होते .सोशल मिडियावर हि कारवाईची मागणी होत होती त्याची दखल घेत आयुक्त रश्मी शुक्ला यांंनी तातडीने बदली केली आहे त्यांची विषेश शाखेत बदली झाली आहे त्यांच्या जागी श्री मिलींद पाटील यांची नियुक्ती झाली आहे मोरे यांची बदली तर झाली परंतु त्यांनी केलेल्या मारणहाणी बद्दल अद्याप पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही एखाद्या नागरीकाने पोलीसांना उलट जरी बोलले तर अधिकारी यांचा ईगो हट्ट होतो व सरकारी कामात अडथळा च्या नावाखाली अनेक प्रकार होऊन जातात परंतु पत्रकाराला मारहाण प्रकरणात अजुन एसीपी निलेश मोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने कायदा हा फक्त नागरीकांन पुरताच मर्यादित असल्याचे दिसून आले.

पत्रकार संरक्षण समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले या प्रकरणी कारवाई व्हावी.

अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनाची दखल घेत डॉ नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली व एका दिवसात निलेश मोरे यांची बदली केलेली आहे