खडसे प्रस्थापित नेते, तर राणे हे विस्थापित – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
680

पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे !

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – माजी मंत्री एकनाथ खडसे प्रस्थापित नेते, तर नारायण राणे हे विस्थापित नेते आहेत. पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे ! असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून नागपूरला आलेल्या पत्रकारांशी सुयोग या निवासी शिबीरात येथे अनौपचारिक गप्पा मारताना आपले मत व्यक्त केले.

महाराष्ट्र स्वाभिमान नेते नारायण राणे यांना मंत्री पद दिले जाईल अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. पण त्याला काही मुहूर्त सापडेना, असे झालेले आहे. अशात मागील अनेक दिवस राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावराबरोबरच एनडीएचे घटक पक्ष बनलेले नारायण राणे आणि भ्रष्टाचारासह विविध आरोपावरून मंत्रीपदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे यांच्या समावेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यानुसार एकनाथ खडसे हे प्रस्थापित नेते आहेत. पुनर्वसन विस्थापितांचे होते, प्रस्थापितांचे नव्हे, असे सांगत विस्थापित असलेल्या नारायण राणे यांची जबाबदारी राज्य सरकारवर आहे. तर मंत्री पदावरून पायउतार झालेले एकनाथ खडसे हे भाजपमधील प्रस्थापित नेते असल्याची स्पष्ट कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुर्न: प्रवेशाची शक्यता अप्रत्यक्षरित्या फेटाळून लावली. यंदाच्या अधिवेशनात एकनाथ खडसे हे पक्षातील ज्येष्ठ नेते असूनही सातत्याने राज्य सरकारच्या धोरणावर सातत्याने विधानसभेत हल्ला चढवित आहेत. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळात समावेश होणार का? मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना छेडले. त्यावर पुढील अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजेच असे सांगत त्यामध्ये विस्थापितांना स्थान मिळणार असल्याचे संकेत देत नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला दुजोरा दिला. गुजरातमधील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपा सरकार आणखी स्थिर झाले आहे, असा दावा करताना कोलांटउड्या मारण्याच्या बेतात असलेले अनेकजण आता भानावर येतील, असा टोमणाही फडणवीस यांनी लगावला. गुजरातेत भाजपाला ४९.४ टक्के मते मिळाली. सुमारे पन्नास टक्के मिळवणार्‍या पक्षाला सत्तेवर येण्याची संधी देशात फार कमीवेळा मिळाली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. गुजरातेत राष्ट्रवादीने काँग्रेसचे मतविभाजन केले म्हणून भाजपाच्या ९९ जागा आल्या असे म्हणणे म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेमुळे काँग्रेसच्या ७४ जागा आल्या असे समजण्याइतके हास्यास्पद आहे, असा टोमणा फडणवीस यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना लगावला. सत्तेत राहूनही शिवसेनेचे सरकारविरोधी वक्‍तव्ये करणे आपल्याला पटत नसले, तरी आमचे सेनेशी चांगलेच संबंध आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रावर या निकालाचा काय परिणाम होईल? असे विचारले असता, आता आम्ही अधिक स्थिर झालो आहोत. काहीजण कोलांटउड्या मारण्याच्या तयारीत होते, आता ते भानावर येतील अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात भाजपच सातत्याने नंबर एकचा पक्ष असल्याचे झालेल्या निवडंणुकात सिध्द झाले असून अन्य शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे सगळेच पक्ष विरोधात असतानाही भाजपने यश मिळवल्याची अनेक उदाहरणे आहेत. मतदारांनी भाजपाबरोबरच शिवसेनेलाही मतदान केले आहे. यामुळे अजून जनतेची काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याची मानसिकता नाही हेच दिसून येते, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेत विदर्भाच्या बाहेरून आलेले लोक अधिक होते. त्यांच्या यात्रे दरम्यान झालेल्या एकाही सभेला तीनशेपेक्षा जास्त लोक नव्हते, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. कोकणात येवू घातलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीला सध्या शिवसेनेकडून विरोध होत असला तरी ही रिफायनरी आणण्यासाठी शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते, खासदार विनायक राऊत यांनी प्रयत्न केले. तसेच ही रिफायनरी ग्रीन ग्रीन रिफायनरी असल्याने यातून प्रदुषण होणार नसून त्याचा परिणाम समुद्रातील वन्यजीवांवरही होणार नाही. मुंबईतील आणि चेन्नईतील काही एनजीओकडून जाणीवपूर्वक रिफानरीजच्या विरोधात वातावरण निर्माण करून आंदोलन केले जात असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. याचबरोबर गुजरात विधानसभेच्या निकालावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २२ वर्षानंतरही गुजरातमधील ५० टक्के जनतेने भाजपवर विश्वास दाखविला आहे. तसेच पॉलिटीकली अर्थमँटीकनुसार भाजपच्या मतांमध्येही दिड टक्क्याने वाढ झाल्याचे दिसून येत असल्याने गुजरातमधील विजय एकहाती विजय आहे.