संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे रंग भरण्यास येतोय ‘देवा’

0
659
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी – पुणे 
‘देवा एक अतरंगी’ हा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या आयुष्यात नवा रंग भरण्यास सज्ज झाला आहे. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन नेमका कसा असावा, हे जाणून घ्यायचे असेल, तर ‘देवा’ या आगामी सिनेमातील अंकुशने साकारलेल्या पात्राला प्रत्येकांनी भेटायलाच हवे !  मध्यरात्री सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँच झालेला सिनेमाचा पोस्टर असो वा, महाराष्ट्रातील निवडक ए.टी.एम.वर झळकणारे ‘देवा’ सिनेमाचे टीझर असो, लोकांच्या झोळीत आनंद वाटणा-या या ‘देवा’ ची होत असलेली पूर्वप्रसिद्धी चर्चेचा विषय ठरत आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित तसेच दक्षिणात्य दिग्दर्शक मुरली नल्लप्पा दिग्दर्शित ‘देवा’ हा सिनेमा येत्या २२ डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
या सिनेमाच्या ट्रेलरने आणि गाण्याने प्रेक्षकांना मोहिनी घातली असून, ‘देवा’ सिनेमाचा रंगबेरंगी टीझरदेखील लोकांना आवडत आहे. कोकणात चित्रीत झालेल्या या सिनेमात मराठीची ग्लॅम अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची प्रमुख भूमिका आहे. देवा’ चा शोध घेत असलेल्या ‘माया’ चे पात्र ती वठवत असून, एका लेखिकेच्या भूमिकेतून ती लोकांसमोर येत आहे. तसेच, अभिनेत्री स्पृहा जोशीची द्देखील विशेष भूमिका या सिनेमात आहे. ‘देवा’ सिनेमातील सुमधुर गाणी, देवाच्या प्रसिद्धीला चारचांद लावत आहे. या सिनेमातील श्रेया घोषाल आणि सोनू निगमने गायलेले ‘रोज रोज नव्याने’ हे सुरेल गाणे रसिकांना मंत्रमुग्ध करीत आहे. तसेच, अजय गोगावले याच्या आवाजातील या सिनेमाचे एन्थम साँगदेखील जमून आले आहे. विशेष म्हणजे, नृत्यदिग्दर्शनात ‘देवा’ असणाऱ्या प्रभूदेवाने ‘देवा’ चे हे एन्थम साँग आपल्या ट्विटर अकाऊंट सर्वप्रथम सादर केले होते. देवाच्या अंतरंगी व्यक्तिमत्वाची झलक दाखवणारे हे गाणे लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले आहे. या सिनेमातील हि दोन्ही गाणी क्षितीज पटवर्धन यांनी लिहिली असून, अमितराज यांनी या गाण्यांचे संगीतदिग्दर्शन केले आहे. त्याचप्रमाणे ‘जराशी जराशी’ हे स्पृहा आणि अंकुशवर आधारित असलेले नव्या उमेदीचे गाणे, आयुष्याला नवीन स्फुरण देणारे ठरत आहे. गुरु ठाकूर लिखित या गाण्याला अमितराज यांनी ताल दिला असून, हर्षवर्धन वावरेचा गोड आवाज या गाण्याला लाभला आहे. कवी गुरु ठाकूर यांच्या हस्ते लाँच करण्यात आलेले हे गाणेसुद्धा हिट ठरत आहे. अश्याप्रकारे ‘देवा’ सिनेमातील सर्वच गाणी आणि ट्रेलरची संपूर्ण महाराष्ट्रात हवा पाहायला मिळत आहे.
ह्या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अंकुश चौधरी आणि ‘देवा’ मध्ये भरपूर साम्य आहे. ख-या आयुष्यात अंकुश असाच असल्यामुळे ‘देवा’ हि भूमिका मी स्वतः जगलो असल्याचे अंकुश सांगतो. महाराष्ट्राच्या कानाकोप-यात राहत असलेल्या सामान्य माणसांपर्यत पोहोचण्यासाठी ‘देवा’ या सिनेमाची टीम विविध शक्कल लढवताना दिसून येत आहे. ज्यात’देवा’ व्यक्तिरेखेच्या खास हेअरकटचा देखील समावेश आहे. या ‘देवा’ हेअरकटचा ट्रेंड बाजारात रुजू झाला असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ‘देवा’ सिनेमाचा बोलबाला केला जात आहे.
ह्या सिनेमात डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकार झळकणार असून, दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांची खास झलक पाहायला मिळणार आहे. २०१७ च्या उत्तरार्धात आणि नाताळ सणाच्या काही दिवस आधी सर्वत्र प्रदर्शित होत असलेला हा सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची दुहेरी मेजवानी देणारा ठरणार, हे नक्की.