*मडाखेड (खु) येथे रोग निदान व औषोधोपचार शिबीर संपन्न..*

0
746
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण ,बुलडाणा

बुलडाणा:- – जळगांव जामोद येथील सातपुडा शिक्षण संस्थे द्वारा संचालीत स्वा.विर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम मडाखेड खु. येथे भव्य रोगनिदान व औषधोपचार शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात तपासणी करीता बालरोग तज्ज्ञ डॉ. संदिप वाकेकर व दंतरोग तज्ञ डॉ.सौ. स्वातीताई वाकेकर यांनी सेवा दिली.

प्रसंगी गरजू रुग्णांना औषधोपचार सुद्धा करण्यात आला. यावेळी राजू शित्रे (सरपंच मडाखेड) शाळा शिक्षण समितीचे प्रमुख संजय सोळंके,सुनील जवंजाळ (उपसरपंच), अशोक बारहाते, मुख्याध्यापक चोपडे सर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे संचालन आटोळे सर, तर आभार राठोड सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विध्यार्थी यांनी परिश्रम घेतले.