चाकूच्या धाकावर वयोवृद्धाला लुटले

0
534
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण,बुलडाणा

बुलडाणा :- खामगाव येथील रेल्वेस्थानक वर चाकूच्या धाकावर एका वयोवृद्धाला लुटल्याची घटना काल मध्यरात्री घडली .दिगंबर लक्ष्मण देशमुख वय वर्ष 65 रा पंचवटी अमरावती हे काल रात्री खामगाव येथील रेल्वे स्थानकावर रेल्वेत बसलेले असतांना त्यांच्या जवळ तीन अज्ञात इसम आले तुझ्या थैलीत गांजा आहे आम्हाला तुझी थैली दाखव असे देशमुख यांना म्हणाले त्यावर देशमुख यांनी माझ्या कडे गांजा नाही असे म्हंटले तितक्यात एकाने चाकू काढून देशमुख यांच्या छातीला लावला आणि त्यांचे कडून 750 रुपये लुटले
देशमुख यांच्या तक्रारी वरून शेगाव रेल्वे पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींन विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे