संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाला यश! – नदीपात्रातिल ब्लास्टिंग त्वरित बंद

0
712
Google search engine
Google search engine

जळगाव जामोद/ राहुल निर्मळ :-

राज्यमधला बुलढाणा जिल्ह्यातील सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा जिगाव प्रकल्प येथे सुरु असलेल्या ब्लॉस्टिंग बंद करण्या संदर्भात संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदनद्वारे मागणी केलि होती.
संभाजी ब्रिगेडच्या निवेदनात जिगाव प्रकल्प येथे सुरु असलेल्या आडोळ बु. गावालगत नदीपात्रात दिवसरात्र धरणासाठी लागणाऱ्या दगडांसाठी ब्लास्टिंग केल्या जात होती. ब्लास्टिंग गावालगत असल्यामुळे गावातील अनेक घराणा यामुळे तडे जात होते. तसेच स्फोटकांच्या आवाजामुळेही नागरिक त्रस्त झाले होते.त्यामुळे ब्लास्टिंग बंद करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून निवेदनाद्वारे करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेता जिगाव प्रकल्प येथील आडोळ बु नदीपात्रातिल ब्लास्टिंग त्वरित बंद करण्यात आले आहे.
परंतु या निवेदनातील आणखी महत्वाच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.

यामध्ये जिगाव प्रकल्प येथील सुरु असलेल्या कामावर अपघात घडल्यास अपघातग्रस्त व्यक्तीना रुग्णालयात नेण्यासाठी याठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध नाही. तसेच या प्रकल्पावर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांचा कामाच्या ठिकाणी मुक्तसंचार आहे. त्यामुळे या लहान मुलांचे भवितव्य अंधारात जाणार यावरही प्रश्नचिन्ह आहे.
त्यामुळे या महत्वाच्या प्रश्नावर लक्ष देण्याची गरज आहे.तचेस कामगारांच्या मुलांची शिक्षण व इतर व्यवस्था करण्याची जबाबदारी पी.व्ही.आर कंपनीची आहे.

जिगाव प्रकल्प येथे अनेक प्रश्न राखडलेले आहे. या प्रश्नावर शासनाने तोड़गा काढावा.त्यापैकी महत्वाचा सुरक्षा प्रश्न असून याकडे जिगाव प्रकल्प अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे. जिगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रत्येक प्रश्न निकाली लावण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रकल्पग्रस्त पाठीशी उभी आहे. – अमोल दाभाडे . जिल्हा उपाध्यक्ष – संभाजी ब्रिगेड.

जिगाव प्रकल्प हा जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सिंचनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. परंतु या प्रकल्पात येणाऱ्या बुडित क्षेत्रातील गावांच्या प्रत्येक प्रश्न सोडविन्यासाठी संभाजी ब्रिगेड तत्पर आहे.- राहुल वाघ. संभाजी ब्रिगेड- तालुका अध्यक्ष जळगाव जामोद.