*अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सामान्यज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण संपन्न*

0
1122

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले –

अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेद्वारा राबविण्यात आलेल्या सामाजिक समरसता पंधरवड्यातील शेवटचा कार्यक्रम सामान्यज्ञान परीक्षेचे बक्षीस वितरण व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.

दि, 20 डिसेंबर2 2017 रोजी वैशाली देशपांडे पब्लिक स्कूल येथे अखिल भारतीय विध्यार्थी परिषदे द्वारा आयोजित सामाजिक समरसता पंधरवड्यातील निरोप समारंभ तसेच सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल व बक्षिक वितरण सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमामध्ये आलेला पाहुण्यांचे औक्षवान कु प्रतीक्षा ठाकूर आणि कु भावना तायडे यांनी केले तसेच नंतर अचलपूर नगर कार्यकारिणीचे नगर मंत्री शुभम काकडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले नंतर प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले शरदजी पुसदकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना सामाजिक समरसता पंधरवडा या बद्दल महत्वाचे मार्गदर्शन केले ते म्हणाले की सामाजिक समरसता पंधरवडा हा एक सर्वानुमाते पार पाडन्यात येणाऱ्या सामाजिक हिताच्या कार्यक्रमाचा सोहळा होय या मध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद व कोणत्याही प्रकारचा स्वयंहित नसते , नंतर कार्यक्रमला लाभलेले मा श्री नैकिले सर यांनी विध्याथ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले , तसेच कार्यक्रम अध्यक्ष मा धिरजजी मडघे यांनी सर्वांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिले आणि नंतर सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर केला गेला त्यात प्रथम क्रमांक शशीकांत नाशिबकर , द्वितीय क्रमांक अंकित कडू , तर तृतीय क्रमांक सलोनी पवार आदींना ठोकळा पुस्तक , रोख रक्कम आणि शिल्ड प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले
आणि शेवटी आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे , सर्व अ भा वि प चे पूर्व कार्यकर्ते आणि सर्व शिक्षक गण आदींचे शब्दसुमनांनी आभार अ भा वि प अचलपूर नगरचे कलामंच प्रमुख हरीश चव्हाण यांनी केले, आणि कार्यक्रमाचे संचालन कु माधवी काकडे हिने केले
या मध्ये अ भा वि प चे पूर्व कार्यकर्ते गौरव मेहर, भा ज प शाखा अचलपूर चे महामंत्री पं गजानन शर्मा अ भा वि प चे पूर्णवेळ विस्तारक आकाशजी सातपुते तसेच तत्कालीन अ भा वि प अचलपूर शाखेचे नागरमंत्री शुभम काकडे , सहनगरमंत्री दिनकर माकडे , महाविद्यालयीन प्रमुख आदित्य ठाकरे, कार्यालयीन मंत्री किरण भोंडे, सह कार्यालयीन मंत्री पावन गजघाटे , प्रसिद्धी प्रमुख गौरव अटलकर , सहप्रसिद्धी प्रमुख दीपक सोनोने, कलामंच प्रमुख हरीश चव्हाण आदी कार्यकर्ते तसेच सर्व पूर्व कार्यकर्ते उपस्थित होते.