शासनाच्या योजना तळागळातील लाभार्थी पर्यंत पोहचवा – मा. ना.श्री मधुकरराव कांबळे

0
1034
Google search engine
Google search engine

दयालसिंग चव्हाण-बुलडाणा

बुलडाणा :- मा. ना.मधुकरराव कांबळे यांनी संग्रामपुर पंचायत समिती येथे दि.23 डिसेंबर रोजी भेट दिली.
शासनाच्या अनेक योजना लोकहितासत्व आहेत. परंतु त्या लाभार्थीपर्यंत पोहचत नसल्याने ते वंचित राहतात. त्यांना लाभ मिळावा त्याकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना तळागळातील खऱ्या लाभार्थी पर्यंत पोहचवा असे मा.ना. मधुकरराव कांबळे यांनी संग्रामपुर येथे सदिच्छा भेट प्रसंगी सांगितले.

सामाजिक व न्याय मंत्री तथा म.रा.अण्णा भाऊ साठे स्मारक समिती सदस्य ना.मधुकरराव कांबळे यांनी आज दि.23 डिसेंबर रोजी संग्रामपुर येथे भेट दिली यावेळी पं. स.कार्यालयात कृ. उ.बा. समिती सभापती गजानन दाणे व भाजपा तालुकाध्यक्ष डॉ गणेश दातीर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी मा.ना. मधुकरराव कांबळे यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली व समाज जागृती आणि विकासासाठी कार्यकर्ते व बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.तसेच डॉ संजय कुटे आमदार यांची मंत्रिमंडळात सुद्धा समावेश होणार असल्याचे ना.कांबळे यांनी सांगितले.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ गणेश दातीर,कृ. उ.बा. स.सभापती गजानन दाणे, माजी सभापती पांडुरंग हागे,भारतभाऊ वाघ, जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी, राजू मुयांडे, आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.