दोन विद्यार्थी स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेत खेळण्याकरीता चीनला जाणार….

0
678

प्रतिनिधी:-समीर देशमुख –

श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय, शेगावचे पाच विद्यार्थ्यांची निवड राज्यस्तरावर स्तरावर झालेली असून त्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी निवड आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पेशल ऑलम्पिक स्पर्धेकरीता झालेली आहे.
ह्यामध्ये जगदीश पाटील, जगदीश थोरात व अजय जाधव यांची निवड झाली. सदर
शाळेतील विद्यार्थी हे दिव्यांग असून त्यांचा बौध्दीक विकास हा शारिरीक वाढीपेक्षा कमी आहे. तरी हे विद्यार्थी खेळामध्ये चांगली कामगिरी करु
शकतात हे आता या मुलांच्या खेळातून दिसून येत आहे, या व्यतिरीक्त हे विद्यार्थी समुह गायन, वादन, नृत्य तसेच चित्रकला व हस्तकला यातुन राज्य
व राष्ट्रीय स्तरावर चमकलेले आहेत. हे सर्व पाहता श्री संत गजानन महाराजांच्या आशीर्वादाने ही मुले ह्या विद्यालयात शिक्षण, प्रशिक्षीत
शिक्षकांच्या अथक परिश्रमातुन घेत आहेत. या मुलांच्या कला गुणांना वाव
मिळावा म्हणून 12 जानेवारी 2018 ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त समूहनृत्य सादर करण्याकरीता शेगांवच्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी
महाविद्यालयाने अधिकृत निमंत्रीत केले आहे. तसेच ही मुले जानेवारी 2018
मध्ये उमेदवा परिवार पुणे तर्फे आयोजित चित्रकला व हस्तकला राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होणार आहेत, त्यासाठी ही मुले सराव करत आहेत.
संस्थेतील सर्व संचालक मुख्याध्यापक व कर्मचारी या मुलांचे कौतुक करुन प्रेरीत करत आहेत. ह्या मुलांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. ह्या विद्यालयात 3 डिसेंबर जागतिक अपंगदिनाचे औचित्य साधुन एक सप्ताह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, श्रमदान, स्वच्छ शाळा अभियान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, लॉयन्स
क्लबद्वारे मुलांना बक्षीस वितरण तसेच काशेलानी कॉन्व्हेंट व मतिमंद विद्यालयांच्या विद्यमाने विविध खेळ, स्पर्धा घेण्यात आल्या. या
विद्यालयात पालकमेळावा आयोजित करुन पालकांना शासनाच्या सोयी व सुविधा,
विधीसेवा तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून वैद्यकीय माहिती व पुढील बालकांच्या विकासाच्या बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. या
विद्यालयाचे वैशिष्टय म्हणजे विद्यार्थ्यांना भोजन, निवास, औषधोपचार मोफत
दिल्या जातो. अशा या दिव्यांग बालकांच्या विकासाकडे समाजाने लक्ष देवुन त्यांना मुळ
प्रवाहात आणण्याकरीता प्रयत्न करावे, एवढेच..